28 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeमुंबईआदित्य ठाकरेंचे मुंबई महापालिका प्रशासकांना पत्र; सत्ताधाऱ्यांना निवडणुका घ्यायच्या नाहीत, मुंबईचे खच्चीकरण...

आदित्य ठाकरेंचे मुंबई महापालिका प्रशासकांना पत्र; सत्ताधाऱ्यांना निवडणुका घ्यायच्या नाहीत, मुंबईचे खच्चीकरण करण्याचा हेतू

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प (BMC Budget 2023) येत्या काही दिवसांत प्रशासक या नात्याने पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल (Iqbal Singh Chahal) सादर करणार आहेत. या पार्श्वभूमीवर युवासेनाप्रमुख आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी आयुक्तांना अर्थसंकल्पाच्या बाबतीत एक पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी एक मुंबईकर या नात्याने नवे प्रकल्प हाती न घेण्याच्या तसेच सुरु असलेल्या प्रकल्पांना निधी द्यावा अशी मागणी केली आहे. तसेच सध्या सत्ताधाऱ्यांना महानगरपालिका निवडणुका घ्यायच्या नाहीत. प्रशासनचा कारभार हा निवडून आलेल्या प्रतिनिधींशिवाय सुरु आहे, ही गोष्ट फक्त आणि फक्त मुंबईचे खच्चीकरण करण्याच्या हेतूने करण्यात येते आहे. वास्तविक पाहता ही धक्कादायक बाब असून लोकशाहीला संपवण्याचा पाया रचला जात आहे, असे आदित्य ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे. (Aditya Thackeray’s letter to Iqbal Singh Chahal in the wake of BMC Budget 2023)

मुंबई महापालिकेतील लोकप्रतिनिधींचा कालावधी संपल्याने पालिकेचा कारभार प्रशासक पाहत आहेत. तब्बल ३८ वर्षांनंतर पालिकेचा कारभार प्रशासकाच्या हाती गेला आहे. ७ मार्च २०२२ पासून आयुक्त चहल प्रशासक म्हणून पालिकेचा कारभार हाकत आहेत. सध्या राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार असल्यामुळे आगामी महापालिका निवडणूका डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प मांडला जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात बोलली जात आहे. एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईत नवे उपक्रम राबविण्यासाठी त्याचा अर्थसंकल्पात समावेश करावा असे आय़ु्क्तांना सुचित केले आहे, तर सध्या पालिकेत लोकप्रतिनीधी नसल्याने आयुक्तांनी केवळ हंगामी अर्थसंकल्प मांडावा, पालिका निवडणूका पार पडल्यानंतर मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प मांडला जावा अशी भूमिका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून घेण्यात आली आहे.

Aditya Thackeray's letter to Iqbal Singh Chahal in the wake of BMC Budget 2023

या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी आता आय़ुक्तांनाच पत्र लिहून अर्थसंकल्पाच्या बाबतीत काही सुचना केल्या आहेत. त्यांनी पत्रात म्हटले आहे की, एक मुंबईकर म्हणून मी महानगरपालिकेला प्रस्तावित करू इच्छितो की, प्रशासकाने अर्थसंकल्पात सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांना निधी देण्यात यावा, परंतु मुंबईचे निवडून आलेले प्रतिनिधी- नगरसेवक, महापौर आणि समिती प्रमुखांच्या अनुपस्थितीत कोणतेही नवीन प्रकल्प हाती घेतले जाऊ नयेत. निवडून आलेले प्रतिनिधी, आणिबाणीची परिस्थिती नसल्याने पालिकेचा निधी नव्या प्रकल्पांवर खर्च करणे चुकीचे असून हे आपल्या लोकशाही मूल्यांच्या आणि संविधानाच्या विरोधात आहे.

हे सुद्धा वाचा

वंदे भारत एक्सप्रेस का आहे खास, ते जाणून घ्या…

एकनाथ शिंदेंच्या समोरच भर व्यासपीठावर न्या. नरेंद्र चपळगावकर यांनी टोचले कान

मुंबई शिर्डी प्रवास होणार वेगवान अन् आरामदायी; राज्यात दोन नव्या वंदे भारत एक्सप्रेस

आदित्य ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे की, सत्ताधाऱ्यांना महानगरपालिका निवडणुका घ्यायच्या नाहीयेत तसेच एक वर्षाहून अधिक काळ उलटून देखील, प्रशासनचा कारभार हा निवडून आलेल्या प्रतिनिधींशिवाय सुरु आहे, ही गोष्ट फक्त आणि फक्त मुंबईचे खच्चीकरण करण्याच्या हेतूने करण्यात येते आहे. वास्तविक पाहता ही धक्कादायक बाब असून लोकशाहीला संपवण्याचा पाया रचला जात आहे. त्यामुळे निवडून आलेल्या प्रतिनिधींच्या हक्कांचे उल्लंघन न करता किंवा मुंबईकरांचे नुकसान न करता, लोकशाही मूल्यांची जपणूक करून सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांवर प्रशासन उचित निर्णय घेईल, असे आदित्य ठाकरे यांनी चहल यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी