29 C
Mumbai
Monday, September 5, 2022
घरमुंबईBhaucha Dhakka : मुंबईतील प्रसिद्ध भाऊच्या धक्क्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Bhaucha Dhakka : मुंबईतील प्रसिद्ध भाऊच्या धक्क्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

मुंबईतील भाऊचा धक्का हे एक असे ठिकाण आहे, जे प्रत्येक मांसाहारी आणि खास करून मासळी प्रेमींची आवडती जागा आहे. पण याच भाऊच्या धक्क्याची गेल्या काही महिन्यांपासून बिकट अवस्था झाली आहे. भाऊच्या धक्क्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होऊ लागल्यामुळे याठिकाणी अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे.

मुंबईतील भाऊचा धक्का हे एक असे ठिकाण आहे, जे प्रत्येक मांसाहारी आणि खास करून मासळी प्रेमींची आवडती जागा आहे. पण याच भाऊच्या धक्क्याची गेल्या काही महिन्यांपासून बिकट अवस्था झाली आहे. भाऊच्या धक्क्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होऊ लागल्यामुळे याठिकाणी अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. भाऊच्या धक्क्याचे बांधकाम जीर्ण होऊ लागल्याने याठिकाणचे सिमेंटचे बांधकाम असलेले खांब पडू लागले आहे. यामुळे दिवसेंदिवस अपघातांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. पण भाऊच्या धक्क्याचा काही भाग हा पाण्यात असल्याने त्याची देखील पाण्याच्या आत पडझड होऊ लागली आहे. यामुळे मच्छिमार यांच्या बोटीचे नुकसाना देखील होऊ लागले आहे. ज्यामुळे मच्छीमार आणि मासेमारीच्या बोटी असलेल्या मालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरू लागले आहे. परिणामी आता बीपीटी प्रशासन आणि राज्य प्रशासन नेमक्या कोणत्या मोठ्या घटनेनंतर या समस्येकडे लक्ष देणार ? असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.

Bhaucha Dhakka : मुंबईतील प्रसिद्ध भाऊच्या धक्क्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

मुंबईसह परिसराला मासळी पुरवठा करणाऱ्या भाऊच्या धक्क्याचे बांधकाम अनेक दशकापूर्वी झाले आहे. हे बांधकाम जीर्ण झाल्यामुळे अनेक ठिकाणी सिमेंट खांब पडले आहे. हे पडलेले खांब अर्धवट अवस्थेत आहेत. त्यामुळे भाऊचा धक्का आणि ये-जा करणाऱ्या बोटींना धोका निर्माण झाला आहे. पाण्यात अर्धवट असलेले खांब दिसून येत नसल्याने दररोज या भाऊच्या धक्क्यावर बोटींची धडक होवून अपघात होत आहेत.

Bhaucha Dhakka : मुंबईतील प्रसिद्ध भाऊच्या धक्क्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

आज (ता. 29 ऑगस्ट) सकाळी सात वाजता करंजा येथील नाखवा निवृत्ती कोळी यांच्या मालकीची असलेली माऊली तुळजामाई एकवीरा नावाची बोट धक्क्याला लावत असताना पाण्यातील लोखंडी/सिमेंट खांब दिसून आले नसल्याने धडक होवून अपघात झाला. IND, MH-7-MM-3184 असा बोटीचा नंबर असून सिमेंट खांबाला धडक लागल्याने बोटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे बोटीत पाणी शिरले. परिणामी बोटीत भरून आणलेल्या मासळीचे खराब होऊन नुकसान झाले आहे. यामध्ये नाखवा निवृत्ती कोळी यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. नाखवा कोळी यांनी आपल्या बोटीचे नुकतेच नूतनीकरण करून मासेमारीसाठी सज्ज केली होती. या नुकसानीचे भरपाई देण्याची मागणी येथील मच्छीमार बांधवांनी केली आहे.

Bhaucha Dhakka : मुंबईतील प्रसिद्ध भाऊच्या धक्क्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

भाऊच्या धक्क्यावर होणाऱ्या अपघाताकडे बीपीटी आणि महाराष्ट्र प्रशासन दुर्लक्ष करत आहे. या ठिकाणी दर आठवड्याला अपघात घडत असतात. परंतु प्रशासन आता आणखी किती अपघातांची वाट पाहणार आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मच्छीमार बांधव अगोदरच अनेक संकटामुळे अडचणीत सापडला आहे. त्यात अशा घटना घडल्या की मोठे नुकसान होत असते. अशा बिकट परिस्थितीत अनेक मच्छीमार व बोट मालक आत्महत्या करण्याचा मार्ग अवलंबतात. त्यामुळे प्रशासन मच्छिमारांच्या आत्महत्येची वाट पाहत आहे का ? असा आरोप करण्यात येत आहे.

बीपीटी प्रशासन आणि महाराष्ट्र शासन यांनी लवकरात लवकर भाऊचा धक्का या ठिकाणाची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. कारण पूर्वीपेक्षा अधिक बोटींची येथे ये-जा वाढली आहे. त्यामुळे येथे बोट लावून माल उतरविण्यासाठी जागा मिळविण्यासाठी बोटींना 8 ते 10 तास वाट पाहावी लागते. त्यामुळे या न्यू फिश जेट्टीचे नूतनीकरण होवून विस्तार करणे गरजेचे आहे. हे नूतनीकरण आणि विस्तारीकरण लवकरात लवकर करण्याची मागणी आता मच्छिमारांकडून जोर धरू लागली असून हे काम करण्यास विलंब केल्यास आंदोलन करण्याचा इशारा काही मच्छीमार संघटनांनी दिला आहे.

हे सुद्धा वाचा

Congress President Election : काॅंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख ठरली? वाचा सविस्तर…

BMC : ऐन गणेशोत्सवाच्या काळात हजारो कामगारांच्या खात्यात शून्य पगार

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींकडून नितेश राणेंचे कौतुक म्हणाले, यह आमदार ‘कामदार’ है

सहज सुटणारा प्रश्न
सध्या राज्यात शिंदे-भाजप सरकार असून केंद्रातील सरकारच्या समविचारी सरकार आहे. हा प्रश्न धडाकेबाज निर्णय घेणाऱ्या महाराष्ट्रातील शिंदे सरकारने मनावर घेतला तर सहज सुटणारा आहे. कारण मुंबई आणि परिसरात मासळी पुरवठा करणारा भाऊचा धक्का खूप महत्त्वाचा आहे. तसेच मासळी उत्पादन निर्यात केल्याने देशाला करोडो रुपयांचे परकीय चलन मिळवून देणारा हा व्यवसाय आहे. या व्यवसायाला वाव देण्यासाठी नूतनीकरणाचा आणि विस्तारीकरणाचा प्रश्न मनावर घेतला तर सहज सुटणारा आहे, असे मत व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी