31 C
Mumbai
Saturday, August 12, 2023
घरमुंबईAndheri East Bypoll Election : निवडणुकीत विजयी होताच ऋतुजा लटकेंचा भाजपला टोला

Andheri East Bypoll Election : निवडणुकीत विजयी होताच ऋतुजा लटकेंचा भाजपला टोला

उद्धव ठाकरे तसेच त्यांच्या सर्व समर्थकांचे आणि मतदारांचे आभार मानले. भाजपला माझ्याविषयी सहानुभूती असती तर, त्यांनी उमेदवार उभा केला नसता असे म्हणत ऋतुजा लटके यांनी भाजपला टोला देखील लगावला.

बहुचर्चित अशा अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांनी विजयाची धगधगती मशाल पेटवली आहे. ऋतुजा लटके यांनी या निवडणुकीत विजय मिळवला असला तरी नोटाला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाल्याने याची सर्वाधिक चर्चा होत आहे. विजयी झाल्यानंतर ऋतुजा लटके यांनी पत्रकार परिषद घेऊन संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे तसेच त्यांच्या सर्व समर्थकांचे आणि मतदारांचे आभार मानले. भाजपला माझ्याविषयी सहानुभूती असती तर, त्यांनी उमेदवार उभा केला नसता असे म्हणत भाजपला टोला देखील लगावला.

अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोट निवडणुकीत विजयी झाल्यानंतर ऋतुजा लटके यांनी सर्वांचे आभार मानले. ‘हा विजय माझे दिवगंत पती रमेश लटके यांचा आहे. त्यांनी केलेल्या कामांच्या पुण्याईवर मतदारांनी मतदान केले. मतदारांनी त्यांनी केलेल्या कामाच्या आधारे मते दिली, असल्याचे ऋतुजा लटके यांनी म्हंटले. मी महाविकास आघाडीची उमेदवार आहे. महाविकास आघाडीतील प्रत्येक कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. त्यासाठी त्यांचे आभार मानत असल्याचे ऋतुजा लटके यांनी सांगितले.

यावेळी पत्रकारांनी त्यांना नोटाबाबत विचारले असता, ‘नोटाचा वापर करण्याचे आवाहन करणाऱ्या व्हिडिओ क्लिप समोर आल्या होत्या. नोटा हा निवडणुकीत महत्त्वाचा आहे. नोटाचा वापर हा जबाबदारीने करायचा असतो. खरं तर माध्यमांनी लोकांना हा प्रश्न विचारायला हवा, असे उत्तर यावेळी ऋतुजा लटके यांच्याकडून देण्यात आले.

हे सुद्धा वाचा

Andheri East Bypoll Election : अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीत रंगला ऋतुजा लटके विरुद्ध ‘नोटा’चा सामना

Narayan Rane : नारायण राणेंचा ठाकरे गटावर हल्लाबोल

CM Eknath Shinde : राज्यात पुन्हा घडणार राजकीय घडामोडी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार गुवाहाटीला

पोटनिवडणुकीत मतदान हे कमी प्रमाणात होत असते. यात आम्हाला चांगलं मतदान झालं आहे. मतदान गुरुवारी झाले होते. हा कामकाजाचा दिवस असल्याने अनेकांना मतदान करणे शक्य झाले नाही. ज्यामुळे ३१ टक्केच मतदान पार पडले, अशी माहिती यावेळी ऋतुजा लटके यांनी दिली. तसेच भाजपला सहानुभूती असती तर त्यांनी फॉर्म भरलाच नसता असेही लटके यांच्याकडून सांगण्यात आले. नोटाला जे मतदान झालं आहे ते भाजपचेच असून त्यांनी या निवडणुकीचा सर्व्हे केला होता. जनतेचा या निवडणुकीतील कौल लक्षात आल्यानेच त्यांनी माघार घेतली असे म्हणत यावेळी ऋतुजा लटके यांनी भाजपवर निशाणा साधला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी