30 C
Mumbai
Saturday, February 4, 2023
घरमुंबईबांधकाम व्यावसायिक अजय आशर, माजी आमदार डॉ. राजेश क्षिरसागर यांची 'मित्र'च्या उपाध्यक्षपदी...

बांधकाम व्यावसायिक अजय आशर, माजी आमदार डॉ. राजेश क्षिरसागर यांची ‘मित्र’च्या उपाध्यक्षपदी नियुक्ती

केंद्र सरकारच्या निती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात यांची महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्र) स्थापना करण्यात आली आहे. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अजय आशर यांची 'मित्र'च्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर शिंदे गटातील माजी आमदार डॉ. राजेश क्षिरसागर यांची देखील उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

केंद्र सरकारच्या निती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात यांची महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्र) स्थापना करण्यात आली आहे. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अजय आशर यांची ‘मित्र’च्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बांधकाम तसेच सामाजिक, नागरी आणि वैद्यकीय क्षेत्रात त्यांचा प्रदीर्घ अनुभव राहिलेला आहे. त्याचबरोबर शिंदे गटातील माजी आमदार डॉ. राजेश क्षिरसागर यांची देखील उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. राजेश क्षिरसागर यांनी राज्य नियोजन आयोगावर उपाध्यक्ष म्हणून देखील काम केले आहे. या नियुक्त्या दोन वर्षांपर्यंत किंवा पुढचा शासनिर्णय येईपर्यंत असणार आहेत, याबाबतचा शासननिर्णय नुकताच जारी करण्यात आला आहे.

निती आयोगाच्या धर्तीवर राज्य सरकराने प्रथमच महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशनची स्थापना केली आहे. अशी संकल्पना राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. निती आयोगाच्या धर्तीवर राज्याचा जलद गतीने विकास साधण्यासाठी ‘मित्र’ची स्थापना करण्यात आली आहे. राज्यातील खासगी आणि अशासकीय संस्थाच्या सहकार्याने राज्याची प्रगती घडवून आणण्याचा मित्रचा मुख्य उद्देश आहे. राज्याचे विकासाचे धोरण ठरविण्यासाठी मित्र संस्था काम पाहणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मित्रचे नियामक मंडळ काम करणार आहे, तर नियामक मंडळाचे अध्यक्ष हे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्यासह वरिष्ठ सनदी अधिकारी देखील या नियामक मंडळात असणार आहेत.
हे सुद्धा वाचा
पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक नसल्याने महिला अत्याचाराच्या घटनांत वाढ, अत्याचार रोखण्यासाठी कठोर उपाययोजना व प्रभावी अंमलबजावणीची गरज : प्रा. डॉ. मनीषा कायंदे

बाबासाहेब पुरंदरेंची मांडणी विकृत व अनहैतासिक, इतिहासकार जयसिंगराव पवार यांचे स्पष्टीकरण

लहानपणी वर्णद्वेष सहन करावा लागला होता, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषि सुनक यांचा खुलासा

बांधकाम व्यावसायिक अजय आशर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. ठाणे आणि परिसरात त्यांचे मोठे गृहप्रकल्प आहेत. शिंदे यांचे निकटवर्तीय असल्याने अजय आशर यांची ‘मित्र’च्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याची चर्चा सुरू आहे. तर शिवसेनेचे माजी आमदार आणि सध्या एकनाथ शिंदे यांच्या गटात असलेले डॉ. राजेश क्षिरसागर यांची देखील ‘मित्र’च्या उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व सोडल्यानंतर शिवसेनेचे अनेक आमदार पदाधिकारी शिंदे गटात आले. त्यामध्ये माजी आमदार राजेश क्षिरसागर यांचा देखील समावेश आहे.

 

 

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!