27 C
Mumbai
Thursday, November 24, 2022
घरमुंबईAllu Arjun Juice : आता मुंबईत मिळणार अल्लू अर्जुन ज्यूस

Allu Arjun Juice : आता मुंबईत मिळणार अल्लू अर्जुन ज्यूस

अल्लू अर्जुनच्या चाहत्यांमध्ये आपले त्याच्यावरचे प्रेम दाखवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे चढाओढ सुरू असते. यामध्ये आता भर पडली आहे ती मुंबईतील प्रसिद्ध बंटी ज्यूस सेंटरची. बंटी ज्यूस सेंटरचा चालक असलेला बंटी अल्लू अर्जुनाचा खूप मोठा चाहता आहे आणि त्याचमुळे त्याने आपल्या ज्यूस सेंटरमध्ये अल्लू अर्जुनच्या नावाने विविध पेये सादर केली आहेत.

‘पुष्पा’ या दक्षिण चित्रपटसृष्टीतील चित्रपटाने संपूर्ण देशाला वेड लावले आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ‘पुष्पा’ या नावाची आणि या चित्रपटातील डायलॉग्सची अनेकांना भुरळ पडली. ‘पुष्पा’ चित्रपट प्रदर्शित होऊन अनेक दिवस उलटले असले तरी ‘पुष्पा’स्टार अल्लु अर्जुनच्या चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. अल्लू अर्जुनच्या चाहत्यांमध्ये आपले त्याच्यावरचे प्रेम दाखवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे चढाओढ सुरू असते. यामध्ये आता भर पडली आहे ती मुंबईतील प्रसिद्ध बंटी ज्यूस सेंटरची. बंटी ज्यूस सेंटरचा चालक असलेला बंटी अल्लू अर्जुनाचा खूप मोठा चाहता आहे आणि त्याचमुळे त्याने आपल्या ज्यूस सेंटरमध्ये अल्लू अर्जुनच्या नावाने विविध पेये (Allu Arjun Juice) सादर केली आहेत. अल्लू अर्जुनचे डायलॉग आणि प्रतिमा असलेल्या विशेष ग्लासमध्ये हे ज्यूस सर्व्ह करण्यात येत असून त्यावर ग्राहकांच्या उड्या पडत आहेत.

अल्लू अर्जुनवर असलेले आपले प्रेम अशा प्रकारे दर्शवण्याचे कारण विचारले असता बंटी ज्यूस सेंटरचे बंटी म्हणाले की, ‘अल्लू अर्जुन सरांच्या पहिल्या चित्रपटापासूनच मी त्यांचा खूप मोठा चाहता आहे. मला त्यांचे सगळे डायलॉग आवडतात पण ‘पुष्पा’ मधील “फायर है मैं.. झुकेगा नाही” हा डायलॉग माझा आवडता आहे.’

हे सुद्धा वाचा

Meta News : ‘मेटा’चे श्अर्स घसरल्याने मार्क झुकरबर्गला मोठा तोटा! कंपनीची कमाई झाली कमी

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : शैलेश लोढा यांनी तारक मेहता मालिका का सोडली ?

Corona Side Effects : कोरोना रुग्णांमध्ये ‘ब्रेन फॉग’चा धोका पुन्हा वाढतोय! जाणून घ्या मेंदूवर कसा परिणाम होतो

‘पुष्पा’ चित्रपट देशभर यशस्वी झाल्यानंतर, अल्लू अर्जुनची लोकप्रियता आणि स्टारडम आकाशाला भिडले आहे. एवढेच नव्हे तर, चित्रपटातील त्याच्या ‘पुष्पा’ या लूकने गणेश चतुर्थी दरम्यान देशभरातील भगवान गणेशाच्या मूर्तींनाही प्रेरणा दिली होती. अल्लू अर्जुनच्या फॅन क्लबने गणपतीच्या मूर्तींची छायाचित्रे आणि व्हिडिओ शेअर केले होते. जिथे गणपती बाप्पांना ‘पुष्पा’सारख्या पांढऱ्या कुर्ता-पायजमामध्ये पाहायला मिळाले. तसेच, ‘पुष्पा’मधील ब्लॉकबस्टर गाणी सामी सामी आणि श्रीवल्ली यांनी नवरात्रीदरम्यान आपले वर्चस्व गाजवले. गरबा भरविण्यात आलेल्या अनेक ठिकाणी पुष्पा चित्रपटातील गाणी वाजवली गेली. दिवाळीतही सुपरस्टार अल्लू अर्जुनचा चेहरा असलेले फटाके देशभर विकले गेले.

अलीकडेच, पुष्पाच्या दुसर्‍या भागाची घोषणा झाली असून, अल्लू अर्जुनचे चाहते त्याला पुन्हा एकदा ‘पुष्पा’च्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रतीक्षा करत आहेत. दक्षिण चित्रपटसृष्टीतील अभिनेता अल्लू अजून याचे अनेक चित्रपट आजवर प्रदर्शित झाले आहेत. पण त्याच्या ‘पुष्पा’ या चित्रपटाने प्रसिद्धीचे वेगळेच शिखर गाठले. दक्षिण चित्रपटसृष्टीत म्हणजेच टॉलीवूडमध्ये अनेक वेगळ्या धाटणीचे चित्रपट बनविण्यात येतात. पण सध्या तरी बंटी ज्यूस सेंटरवरील हे नव्या नावाचे ज्यूस पिण्यासाठी ग्राहक गर्दी करताना दिसत आहेत.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!