32 C
Mumbai
Friday, April 19, 2024
HomeमुंबईMNS Ameya Khopkar : मुस्लिमविरोधी वक्तव्य करणाऱ्या अमेय खोपकरांना हिंदूंनी फटकारले

MNS Ameya Khopkar : मुस्लिमविरोधी वक्तव्य करणाऱ्या अमेय खोपकरांना हिंदूंनी फटकारले

महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे नेते अमेय खोपकर यांनी केलेल्या एका फटाक्यांच्या संदर्भातील ट्विटमुळे ट्विटरवरील वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे.

राज्यभरात दिवाळीचा सण उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यंदाच्या वर्षी दिवाळीत अनेक लोक मनभरून फटाके फोडताना दिसून येत आहेत. तर अनेक लोक वायू प्रदूषण, प्राण्यांना होणार त्रास यामुळे फटाके फोडू नका असेही सांगत आहेत. पण महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे नेते अमेय खोपकर (MNS Ameya Khopkar) यांनी केलेल्या एका फटाक्यांच्या संदर्भातील ट्विटमुळे ट्विटरवरील वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. अमेय खोपकरांनी त्यांच्या या ट्विटमध्ये मुस्लिम समाजाला लक्ष करत ज्या मुस्लिम लोकांना फटाक्यांचा त्रास सहन होतोय त्यांनी कायमच देश सोडून निघून जावं असंही अमेय खोपकर यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हंटले आहे. पण अमेय खोपकर यांच्या ट्विटला अनेक हिंदूंनी उत्तर देत त्यांना चांगलेच फटकारले आहे.

मनसेचे नेते अमेय खोपकर हे कायमच ट्विटरवर ट्विट करत असतात. पण आता त्यांनी केलेल्या ट्विटमुळे वातावरण तापलेले आहे. अमेय खोपकर यांनी ‘ज्या कुणाला फटाक्यांचा त्रास होत असेल त्यांनी बॅगा भरायच्या आणि लगेच मुंबई काय,देश सोडून निघून जायचं. अशा हिंदूद्वेष्ट्या मुसलमानांनी आमच्या देशात रहायची गरजच नाही.आमचा सण आहे,आम्ही फटाके वाजवणारच.आम्ही वर्षानुवर्षं भोंग्यांचा त्रास सहन करतोय ना,मग तुम्ही चार दिवस फटाके सहन करा’ असे ट्विट केले होते.

या ट्विटवर अनेक हिंदू लोकांनी नाराजी व्यक्त करत अमेय खोपकर यांना खडेबोल सुनावले आहेत. अमेय खोपकर यांनी हिंदू-मुस्लिमांमध्ये जातीद्वेष पसरवण्याचे काम करू नये, असे मत अनेक नेटकऱ्यांनी त्यांच्या ट्विटला उत्तर देताना व्यक्त केले आहे. तसेच फटाके फोडणे हे पर्यावरणासाठी आणि त्याचसोबत लोकांच्या आरोग्यासाठी अत्यंत वाईट असेल, असेही म्हंटले आहे.

बहुतांश लोकांनी अमेय खोपकरांच्या या ट्विटला समर्थन दिले आहे. पण अनेकांनी त्यांच्या या ट्विटला नाराजी व्यक्त केली आहे. “फटाक्यांचा त्रास माणसांना होत नाही तर पर्यावरणाला होतोय.. निसर्गाला असं बोलू नका नाहीतर आपल्यावर निघायची वेळ येईल.” असे ट्विट एका नेटकऱ्याकडून करून पर्यावरणाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. तर अनेक नेटकऱ्यांनी अमेय खोकारांना त्यांच्या या मुस्लिमविरोधी वक्तव्यामुळे चांगल्या शब्दात फटकारले सुद्धा आहे.

हे सुद्धा वाचा

Mumbai News : दिवाळीची मिठाई खरेदी करताना लागला 2.4 लाखांचा चुना! मुंबईतील घटना

Bigg Boss Marathi : मिसेस उपमुख्यमंत्री ‘बिग बॉस मराठी’च्या घरात

Mumbai News : फोन रिपेअरिंगला दिला अन् बँकेतून 2 लाख गायब झाले! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

दरम्यान, या ट्विटनंतर आणि लोकांच्या प्रतिक्रियेनंतर अमेय खोपकर यांनी अद्याप तरी यांवर आपले मत व्यक्त केलेले नाही. पण अमेय खोपकरांच्या या ट्विटमुळे ते खरंच मुस्लिम समाजाचा आणि लोकांचा इतका राग का करतात ? असा प्रश्न निर्माण होत आहे. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करा, अशी सर्वांना शपथ दिली होती.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी