29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
HomeमुंबईAmit Shah : अमित शाहांनी देवेंद्र फडणविसांना दाखविली 'जागा' !

Amit Shah : अमित शाहांनी देवेंद्र फडणविसांना दाखविली ‘जागा’ !

आज मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह काही मोजक्या महत्त्वाच्या लोकांसोबत बैठकीचे आयोजन केले आहे, त्यामुळे यावेळी शाह महाराष्ट्रात काय खेळी खेळणार याकडे सुद्धा सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आज मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांच्या समवेत पत्नी सोनल शाह, सूनबाई आणि नातही त्यांच्या या दौऱ्यात सामील झाले असून या दौऱ्याचा शुभारंभ लालबागच्या राजाच्या दर्शनाने झाला. यावेळी अनेक भाजप नेत्यांनी सुद्धा हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा यावेळी उपस्थित होते. लालबागच्या राजाचे दर्शन घेतल्यानंतर अमित शाह मंडपातून बाहेर पडले, लगेचच त्यांच्या डावीकडे विनोद तावडे आणि उजवीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिसले, तर देवेंद्र फडणवीस मागून चालत येत असल्याचे दिसले त्यामुळे अमित शाहांनी देवेंद्र फडणविसांना ‘जागा’ दाखविली का अशा उलट सूलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

2019च्या विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारल्यानंतर विनोद तावडे यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी वर्णी लागली खरी परंतु त्याआधी महाराष्ट्रातील राजकारणापासून काही काळ तावडे यांनी विश्रांती घेतल्याचे दिसून आले, मात्र जेव्हा त्यांची राष्ट्रीय स्तरावर वर्णी लागली तशी त्यांनी फ्रंट सीट घेतल्याची चर्चा सुरू झाली. राज्यात सत्तांतराच्या नाट्यानंतर भलेही शिंदे भाजप सरकार आले असले तरीही भाजप नेते विनोद तावडे सुद्धा तेवढेच परंतु वेगळ्या पद्धतीने सक्रीय असल्याचे पाहायला मिळत आहे.

 हे सुद्धा वाचा…

Marathi people : ‘मराठी माणसांना गाडा, अनं मॉल उभे करा’

Pankaja Munde : पंकजा मुंडेंनी अधिकाऱ्यांना झापले

Ganeshotsav 2022: बुडण्यापासून वाचा – बाप्पाचे विसर्जन स्वयंसेवकांच्या मदतीने करा

Amit Shah : अमित शाहांनी देवेंद्र फडणविसांना दाखविली 'जागा' !

राष्ट्रीय स्तरावरील वर्णीमुळे त्यांच्या दिल्लीत बैठका वाढू लागल्या आहेत, त्यामुळे विनोद तावडे यांची अमित शाह यांच्यासोबत जवळीक वाढली असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान आज सुद्धा लालबागच्या राजाचे दर्शन घेतल्यानंतर अमित शाह यांच्यासोबतच विनोद तावडे दिसून आले त्यामुळे तावडे यांचे भाजपमधील वाढते वजन लक्षात येऊ लागले आहे. दरम्यान, सध्या भाजपमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे देवेंद्र फडणवीस यांचे महत्त्व कमी तर होत नाही ना असा सुद्धा सवाल विचारण्यात येऊ लागला आहे.

गृहमंत्री शहा यांचा मुंबई दौरा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामुळे अमित शाह नेमकं काय करणार याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आज मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह काही मोजक्या महत्त्वाच्या लोकांसोबत बैठकीचे आयोजन केले आहे, त्यामुळे यावेळी शाह महाराष्ट्रात काय खेळी खेळणार याकडे सुद्धा सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी