30 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
HomeमुंबईAshish Shelar : 'विकास योजनांबाबत का शत्रूसारखे वागताय ?', भाजपा नेते आशिष...

Ashish Shelar : ‘विकास योजनांबाबत का शत्रूसारखे वागताय ?’, भाजपा नेते आशिष शेलार यांचा CM ठाकरे यांना सवाल

टिम लय भारी

मुंबई : कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचे (Kanjurmarg Metro Car Shed) काम तात्काळ थांबवण्याचे आदेश नुकतेच मुंबई उच्च न्यायालायने दिल्याने हा प्रकल्प आता न्यायालयीन लढाईत अडकण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. त्यामुळे हा प्रकल्प बीकेसीमध्ये बुलेट ट्रेनचे नियोजित स्टेशन असलेल्या ठिकाणी हलवण्याची तयारी राज्य सरकारने केली आहे. दरम्यान, ठाकरे सरकारने उचललेल्या या पावलांवर भाजपा नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी सडकून टीका केली आहे. विकास योजनांसोबत शत्रूसारखे का वागताय, का महाराष्ट्रद्रोह करताय, अशी विचारणा त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारकडे केली आहे.

याबाबत शेलार आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यपद्धतीमुळे आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र मुंबई बाहेर गेले. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नियोजनानुसार बीकेसीतील भूखंडावर भूभागात बुलेट ट्रेनचे स्टेशन तर पृष्ठभागावर आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र अशी आखणी केली. मात्र आता विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या अहंकारी नियोजनातून बीकेसीत जर मेट्रो कारशेड होणार असेल तर बुलेट ट्रेन होणार नाही आणि पुन्हा आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र मुंबई बाहेर जाईल. असे करून का विकासाशी शत्रू सारखे वागताय? का महाराष्ट्र द्रोह करताय? असा सवाल आशिष शेलार यांनी विचारला आहे.

तर दुस-या ट्विटमध्ये शेलार यांनी म्हटले आहे की, बुलेट ट्रेन नकोच म्हणताय. मेट्रो होऊच नये, अशी व्यवस्था करताय आणि बेस्टचे खाजगीकरण करुन मुंबईकरांची महत्त्वाची व्यवस्था मोडित काढत आहात.? मुंबईकरांनो ठाकरे सरकारच्या या तीन तिघाड्यामुळे मुंबईकरांना भविष्यात प्रवासासाठी वातानुकूलित बैलगाडा मिळणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी