30 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमुंबईमंत्री अशोक चव्हाणांच्या कार्यालयाची धुरा गिरीश महाजनांच्या ‘आदर्श’ सेनापतीकडे

मंत्री अशोक चव्हाणांच्या कार्यालयाची धुरा गिरीश महाजनांच्या ‘आदर्श’ सेनापतीकडे

टीम लय भारी

मुंबई : मुख्यमंत्री पदावर असताना अशोक चव्हाण यांना ‘आदर्श’ कारभार भोवला होता. आता ‘महाविकास आघाडी’च्या सरकारमध्ये त्यांनी जोर लावून सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) हे ‘आदर्श’ खाते पदरी पाडून घेतले आहे. चव्हाण यांनी आपल्या मंत्री कार्यालयात निशिकांत देशपांडे या ‘आदर्श’ अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. चव्हाणांच्या या ‘आदर्श’ भूमिकेमुळे अख्खं मंत्रालय व देशपांडेंना ओळखणारे अधिकारी चकीत झाले आहेत.

महाराष्ट्र सरकारमध्ये हजारभर तरी अधिकारी कार्यरत असतील. त्यातून चव्हाणांनी नेमका हाच ‘आदर्श’ अधिकारी निवडल्याबद्दल मंत्रालयात जोरदार चर्चा सुरू आहे. माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यातले ताईत म्हणून ओळखले जातात. फडणवीस यांनीच पाच वर्षांपूर्वी मुख्यमंत्री असताना यापूर्वीच्या अशोक चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण सरकारमधील अधिकारी मंत्री कार्यालयात घ्यायचा नाही असे फतवे काढले होते. दोन्ही चव्हाण सरकारच्या मंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांचा हा एक प्रकारे अपमानच होता. पण अशोक चव्हाणांनी मात्र फडणवीस सरकारच्या अधिकाऱ्यांना आपल्या कार्यालयात मानाचे स्थान दिले आहे. म्हणूनच त्यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे तत्कालिन खासगी सचिव निशीकांत देशपांडे यांना आपल्या कार्यालयात रूजू करून घेतले आहे. देशपांडे यांनी खासगी सचिव पदाची सूत्रेही हाती घेतली आहेत.

मंत्री अशोक चव्हाणांच्या कार्यालयाची धुरा गिरीश महाजनांच्या ‘आदर्श’ सेनापतीकडे
जाहिरात

धक्कादायक म्हणजे, निशिकांत देशपांडे यांनी जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांना कमालीचे छळले होते. राज्यभरात अभियंत्यांच्या नेमणुकांमधील ‘आदर्श’ किस्से अजूनही चवीने चघळले जातात. जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिवांना सुद्धा निशिकांत देशपांडे जुमानत नव्हते. देशपांडे यांच्या केबिनमध्ये भेटायला गेलेल्या अनेकांना ते एखाद्या आरोपीप्रमाणे उभे करून ठेवायचे. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी व आमदारांना देशपांडे यांनी तुच्छतेची वागणूक दिली होती. निशिकांत देशपांडे यांची चव्हाण यांच्या कार्यालयात नियुक्ती होताच त्यांच्या पूर्वीच्या अशा अनेक कारनाम्यांना आता उजाळा मिळाला आहे.

काँग्रेस पक्षाने छत्रपती शिवराय, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या नावाचा वापर करून जनतेसमोर मते मागितली. या विचारधारेचे रग्गड अधिकारी प्रशासनात आहेत. मग अशोक चव्हाणांना यापैकी एखादाही अधिकारी सापडला नाही का ? असाही सवाल आता उपस्थित होत आहे.

निशिकांत देशपांडे यांना अद्याप नियुक्तीची परवानगी नाही

मंत्र्यांच्या अस्थापनेवर रूजू होण्यासाठी त्या अधिकाऱ्याच्या संबंधित खात्याने परवानगी देणे आवश्यक असते. त्यानंतर सामान्य प्रशासन विभागामार्फत आदेश निर्गमीत होतो. पण देशपांडे यांना खासगी सचिव म्हणून रूजू होण्यास अजून मान्यताच मिळालेली नाही. तरीही त्यांनी खासगी सचिव म्हणून चव्हाण यांच्या कार्यालयात बस्तान बसविले आहे.

पीडब्ल्यूडीतील भ्रष्टाचाराला लाभणार ‘आदर्श कोंदण’ ?

पीडब्ल्यूडी खाते म्हणजे महाभयानक भ्रष्टाचारी खाते म्हणून ओळखले जाते. पीडब्ल्यूडीचे अधिकारी व कंत्राटदार यांचे मजबूत रॅकेट आहे. पीडब्ल्यूडी खात्याचे मंत्रीपद कोणाच्याही वाट्याला येवो, पण आलेल्या मंत्र्याला हे रॅकेट लगेचच आपलेसे करते. ‘आपण सगळे मिळून खाऊ’ असेच अलिखीत धोरण मंत्री, अधिकारी, अभियंते व कंत्राटदार यांच्यामार्फत राबविले जाते. अशोक चव्हाण यांनाही हेच धोरण राबवायचे आहे म्हणून त्यांनी देशपांडेंसारख्या ‘आदर्श’ अधिकाऱ्याला आणले आहे की काय असेही मंत्रालयात बोलले जात आहे.

हे सुद्धा वाचा

Super EXCLUSIVE : मंत्र्यांची कार्यालये, बंगल्यांवर करोडोंची उधळपट्टी; देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यासाठीही कोटीचा चुराडा

आयएएस अधिकाऱ्याच्या पत्नीच्या एका फोनवर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी वाचविले तरूणाचे प्राण

मुख्यमंत्र्यांच्या रडारवर ६० आयएएस अधिकारी

Photo Feature : मंत्री अशोक चव्हाणांनी उडविले पतंग

VIDEO : तळागाळातील रूग्णांसाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा धडाकेबाज निर्णय

वाडियाचा वाद सोडविण्यात अजितदादा, राजेश टोपे यांचेही योगदान

अजितदादांनी मनुकुमार श्रीवास्तव यांचे केले तोंड भरून कौतुक; जिल्हाधिकारी, प्रांताधिकाऱ्यांकडून केली ‘ही’ अपेक्षा व्यक्त

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी