33 C
Mumbai
Tuesday, May 16, 2023
घरमुंबईहृदयस्पर्शी: IPS लेकीने केला DGP वडिलांना सॅल्यूट; व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल

हृदयस्पर्शी: IPS लेकीने केला DGP वडिलांना सॅल्यूट; व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल

वडीलांच्या पाऊलावर पाऊल ठेऊन शेकडो परिश्रम करत आणि घाम गाळात अखेर स्वप्नपूर्ती करून आयपीएस बनलेल्या मुलीने तिच्या आयपीएस वडिलांना सॅल्यूट करून समाजापुढे एक वेगळाच आदर्श ठेवला आहे. आपल्या मुलांनी स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःचं वेगळे स्थान निर्माण करावं, ओळख मिळवावी असं प्रत्येक आई-वडिलांचं स्वप्न असतं असं म्हणतात. जेव्हा मुलगा किंवा मुलगी आत्मनिर्भर होतात तो क्षण हा वडिलांसाठी खूप अभिमानाचा क्षण असतो. असाच एक हृदयस्पर्शी व्हिडीओ आयपीएस अधिकारी जीपी सिंह यांनी त्यांच्या ट्विटरवर शेअर केला असून सध्या तो व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

आसामचे डिजीपी जी.पी.सिंह (IPS G.P SINGH) यांनी 11 फेब्रुवारी रोजी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांची मुलगी ऐश्वर्या सिंहने त्यांना सलाम केलं आहे. यावेळी त्यांनी लिहिलं की, “आज हैदराबादच्या सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीमधून उत्तीर्ण झाल्याबद्दल माझ्या मुलीने मला सलाम केला. या क्षणाचं वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत.” अशा भावना देखील व्यक्त केल्या आहेत.

ट्विटरवर आतापर्यंत पाच लाख 99 हजारांहून अधिक लोकांनी आयपीएस जीपी सिंह यांचा हा व्हिडीओ पाहिला आहे. याच दरम्यान, व्हिडिओला दहा हजारापेक्षा जास्त वेळा लाईक केले गेले आणि 800पेक्षा अधिक वेळा रिट्विट केले गेले आहे.

Image

सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी (SVPNPA) येथे 11 फेब्रुवारी रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत 74 RR चे IPS प्रोबेशनर्स, डायरेक्टर आणि फॅकल्टी सदस्य आणि प्रशिक्षणार्थी अकादमीच्या पोर्टलवरून उत्तीर्ण झाले आणि त्यांनी देशसेवेत पहिले पाऊल ठेवले. यावेळी हा हृदयस्पर्शी प्रसंग घडल्याचे सूचित करण्यात येते.

अनेक युजर्सनी वडील-मुलीचे अभिनंदन करत हा अभिमानाचा क्षण असल्याचं म्हटले आहे. समीरन मिश्रा यांनी लिहिलं आहे की, किती सुंदर क्षण! डॉ. जुरी शर्मा बोरदोलोई यांनी लिहिले आहे की, पालकांसाठी अतिशय अभिमानाचा क्षण! मनन भट्ट यांनी लिहिले आहे की, जय हिंद सर, वडिलांसाठी यापेक्षा मोठा अभिमानाचा क्षण असूच शकत नाही. कमलिका सेनगुप्ता यांनी ग्रेट असं म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा : IAS, IPS दुष्काळी भागात घडणार; प्रभाकर देशमुखांचा कल्पक उपक्रम!

IPS अधिकाऱ्याची कौतुकास्पद कामगिरी, लेकीचा विवाह सोहळा बाजूला ठेवला, अन् बिकट प्रसंगात कर्तव्यावर हजर राहिला

IAS डॉ. सना गुलवानी : पाकिस्तानातील पहिली महिला हिंदू आयएएस अधिकारी; भारतीयांना अभिमान, सिंधी समाजासाठी गौरवास्पद!

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी