32 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
HomeमुंबईMumbai Crime : गोरेगावातील मनसे पर्यावरण सेनेच्या सचिवावर प्राणघातक हल्ला

Mumbai Crime : गोरेगावातील मनसे पर्यावरण सेनेच्या सचिवावर प्राणघातक हल्ला

मुंबई शहरातील गोरेगाव या उपनगरात गुरुवारी रात्रीच्या वेळी घडली. दुचाकीचा हॉर्न का वाजवला या कारणास्तव एका तरुणाला काही तरुणांकडून बेदम मारहाण करण्यात आली. यावेळी त्या तरुणावर काही तरुणांकडून प्राणघातक हल्ला देखील करण्यात आला.

हल्ली कोणाला कोणत्या गोष्टीवरून राग येईल आणि त्या रागाचा पुढे जाऊन नेमका काय परिणाम होईल, हे सांगणे कठीण आहे. बहुतेकवेळा अगदी क्षुल्लक कारणावरून सुद्धा गोष्टी इतक्या विकोपाला जातात की, यामध्ये एकमेकांचा जीव सुद्धा घेण्यात येतो. अशीच एक घटना मुंबई शहरातील गोरेगाव या उपनगरात गुरुवारी (ता. 27 ऑक्टोबर) रात्रीच्या वेळी घडली. दुचाकीचा हॉर्न का वाजवला या कारणास्तव एका तरुणाला काही तरुणांकडून बेदम मारहाण करण्यात आली. यावेळी त्या तरुणावर काही तरुणांकडून प्राणघातक हल्ला देखील करण्यात आला. ज्यामध्ये हल्ला करण्यात आलेला तरुण जखमी होऊन जागीच बेशुद्ध झाला. याप्रकरणी बांगूर नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव येथील महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेचे गौरव गरुडे (वय वर्षे, 31) हे गुरुवारी (ता. 27 ऑक्टोबर) रात्री गोरेगावमधील भगतसिंग नगर 1 येथे एका नातेवाईकाच्या घरी जाण्यास निघाले होते. याचवेळी या परिसरात असलेल्या काही तरुणांसोबत क्षुल्लक कारणावरून गौरवचा वाद झाला. गौरव चालवत असलेल्या दुचाकीचा गौरवने हॉर्न वाजवला. यामुळे गौरव गरुडे आणि गौरववर हल्ला केलेल्या तरुणांमध्ये वाद झाला.

दरम्यान, यांच्यातील वाद इतका विकोपाला गेला की, गौरव यांचा ज्या तरुणांसोबत वाद झाला त्यातील एकाने गौरव यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या वादामध्ये गौरव यांच्या डोक्यात एका तरुणाकडून दगड घालण्यात आला. या हल्ल्यात गौरव गरुडे हे जागीच बेशुद्ध झाले. तसेच या हल्ल्यामध्ये गौरव यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे देखील सांगण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

Sharad Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची तब्येत खालावली! मुंबईतील ब्रीज कँडी रुग्णालयात दाखल

Gujarat Morbi Bridge Collapse : इंग्रजांनी बांधलेला 140 वर्ष जूना पूल भाजप सरकारने 5 दिवसांत पाण्यात घातला

Karan Johar : करण जोहर बघतोय पाकिस्तानी सिनेमे! फोटो तुफान व्हायरल

या घटनेनंतर गौरव गरुडे यांना तात्काळ जोगेश्वरी पूर्व येथील ट्रामा हॉस्पिटल येथे उपचाराकरिता भरती करण्यात आले. पण गौरव गरुडे यांची प्रकृती नाजूक असल्यामुळे त्यांना तेथून परळ येथील ग्लोबल हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले. याप्रकरणी बांगूर नगर पोलीस ठाण्यात कलम 307 आणि 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून या प्रकरणात चौघांना अटक करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. तर अद्यापही काही जण फरार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, या घटनेचा एका व्हिडीओ व्हायरल झाला असून या घटनेतील महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेचे सचिव गौरव गरुडे हे आपला बचाव करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. सध्या या घटनेचा आणखी तपास बांगूर नगर पोलिसांकडून करण्यात येत आहे. तसेच या घटनेतील गौरव गरुडे यांच्यावर हल्ला केलेले हल्लेखोर हे 25 ते 30 वयोगटातील असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी