31 C
Mumbai
Saturday, September 3, 2022
घरमुंबईAzadi ka Amrit Mahotsav : ग्रीनफन फाऊंडेशनकडून वृक्षारोपण, कृष्णा चतुर्वेदी यांची उपस्थिती

Azadi ka Amrit Mahotsav : ग्रीनफन फाऊंडेशनकडून वृक्षारोपण, कृष्णा चतुर्वेदी यांची उपस्थिती

मनुष्याला शंभर वर्षे जगायचे असेल तर झाडे लावली पाहिजेत. वृक्षप्रेम हे ईश्वर प्रेमाप्रमाणेच आहे ते सर्वांनी करायला हवे. सर्वांनी आपल्या सोसायटीमध्ये, शाळेमध्ये, हॉस्पिटल परिसरामध्ये किंवा जिथे मोकळी जागा मिळेल तिथे वृक्षारोपण करायला हव, असे म्हणून अभिनेता कृष्णा चतुर्वेदी यांनी उपस्थितांना वृक्षारोपनासाठी आवाहन केले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे निमित्त साधून राज्यभरातून वेगवेगळे कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. काहीतरी नाविण्यपुर्ण, समाजपयोगी, पर्यावरण पूरक अशा कार्यक्रमांची रेलचेल सध्या पाहायला मिळत आहे. ग्रीनफन फाऊंडेशनच्या वतीने सुद्धा केशव व्यायामशाळा मैदान येथे बॉलीवूड अभिनेता कृष्णा चतुर्वेदी यांच्या हस्ते पर्यावरणपूरक झाडे लावून वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पाडला. यावेळी  ग्रीनफन फाऊंडेशनचे अध्यक्ष हणमंत दडस, संचालक अमोल बावस्कर व अनुराग चतुर्वेदी तसेच मैदान कर्मचारी आणि इतर संस्थेचे सभासद उपस्थित होते. पर्यावरणाचे महत्त्व जपत ग्रीनफन फाऊंडेशन या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यातून पर्यावरण जतनाचा संदेश यावेळी देण्यात आला.
हे सुद्धा वाचा…
याप्रसंगी अभिनेते कृष्णा चतुर्वेदी यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली होती. यावेळी बोलताना अभिनेते कृष्णा चतुर्वेदी म्हणाले, सर्वांनी एकत्र येऊन देशाला स्वच्छ व हिरवेगार केले पाहिजे त्यासाठी वृक्षारोपण करायला हवे. शहरांना प्रदूषणमुक्त करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड केली पाहिजे. मनुष्याला शंभर वर्षे जगायचे असेल तर झाडे लावली पाहिजेत. वृक्षप्रेम हे ईश्वर प्रेमाप्रमाणेच आहे ते सर्वांनी करायला हवे. सर्वांनी आपल्या सोसायटीमध्ये, शाळेमध्ये, हॉस्पिटल परिसरामध्ये किंवा जिथे मोकळी जागा मिळेल तिथे वृक्षारोपण करायला हव, असे म्हणून चतुर्वेदी यांनी उपस्थितांना वृक्षारोपनासाठी आवाहन केले.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी