34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमुंबईभायखळा हबीब मार्केटमध्ये बाबासाहेब यांचं स्मारक व्हावं; ज्येष्ठ लेखक जयराम पवार यांची...

भायखळा हबीब मार्केटमध्ये बाबासाहेब यांचं स्मारक व्हावं; ज्येष्ठ लेखक जयराम पवार यांची मागणी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई यांचं लग्न भायखळा येथील हबीब मच्छी मार्केट मध्ये झालं होतं. आज त्यांच्या लग्नाची 117 वा वाढदिवस आहे. हबीब मार्केटमध्ये महापुरुष यांच्या आठवणी आहेत. यामुळे या ठिकाणी मोठं स्मारक व्हाव, अशी मागणी ज्येष्ठ लेखक जी.व्ही पवार यांनी केली आहे. जी.व्ही पवार हे जेष्ठ लेखक आहेत. त्यांनी याबाबत एक निवेदन जारी केले असून त्यात त्यांनी स्मारकाची मागणी केली आहे.

आज दिनांक 4 एप्रिल म्हणजे आपले आई-बाबा माता रमाई आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आजच्या भाषेत 117वी मॅरेज ॲनिवरसरी आहे. बाबासाहेबांवर सुमारे शंभर लेखकांनी वेगवेगळ्या भाषेत आणि दृष्टिकोनातून चरित्रे लिहिली असून माता रमाईंवर जवळपास वीस पंचवीस पुस्तके लिहिण्यात आली आहेत, परंतु एकाही चरित्रकाराने बाबासाहेब- आईसाहेब यांच्या विवाहाची तारीख व विवाहाचे स्थळ दिलेले नाही. बाबासाहेबांनी आपले आत्मचरित्र ‘वेटिंग फॉर व्हिसा’ या नावाने अपूर्ण दिले असून त्यातही त्यांनी आपल्या विवाहाची वेळ, तारीख, स्थळ याबद्दल लिहिले नाही. एवढेच नव्हे तर बॅरिस्टर असलेल्या बाबासाहेबांना विवाह नोंदणी कायदा माहित असून त्यांनी आपला विवाह नोंदविला नाही. मी संशोधक नाही परंतु रमाईची जन्मतारीख, त्यांच्या विवाहाची तारीख व विवाह स्थळ या तिन्ही प्रश्नांनी मी अस्वस्थ झालो होतो. या तिन्ही प्रश्नांची उत्तरे मी शोधली याबद्दल मी माझी पाठ थोपटत आहे, अस ज वी पवार यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

मी रमाईंची जन्मतारीख 7 फेब्रुवारी 1897 शोधल्यामुळे आज जगभर त्यांची जयंती साजरी केली जात आहे. बाबासाहेबांचा विवाह हा 4 एप्रिल 1906 रोजी झाल्यामुळे तो दिवसही काही प्रमाणात साजरा होत आहे, परंतु विवाह स्थळाबद्दल तसे होताना दिसत नाही. आईसाहेब- बाबासाहेब यांचा विवाह मुंबईतील भायखळा पश्चिम विभागातील सुंदरगल्ली जवळील हबीब या मासळी बाजारात रात्री पार पडला.याचा सविस्तर पुरावा मी माझ्या बाबांची रामू या पुस्तकात दिला आहे. बाबासाहेबांचे पाय ज्या ज्या मातीला लागले तेथे तेथे त्यांची स्मारके उभारली जात आहेत. पण विवाह सारखे अत्यंत महत्त्वाचे स्थळ नाकारले जात आहे. आणि म्हणून माझी महाराष्ट्र शासन तसेच मुंबई महानगरपालिका व जनतेला विनंती आहे की हबीब मार्केट येथे उचित स्मारक व्हावे, अशी ही त्यांची मागणी आहे.

हे सुद्धा वाचा :

तोंड काळे झालेले वाचाळ चंद्रकांत पाटील यांची बेताल बडबड; म्हणे, आंबेडकर जयंती, गणेशोत्सव, नवरात्रात कार्यकर्ते भीक मागतात!

आता गुडीपाडवा, आंबेडकर जयंतीलाही मिळणार आनंदाचा शिधा; राज्य शासनाचा निर्णय

PHOTO : चैत्यभूमीवर देशभरातून लाखोंच्या संख्येने आंबेडकरी अनुयायांचा महासागर लोटला

Babasaheb Ambedkar memorial should be built in Byculla Habib Market; Senior writer Jairam Pawar’s demand, Bhimrao Ramji Ambedkar

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी