31 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeमुंबईबीबीसी कार्यालयात सलग तिसऱ्या दिवशी छापेमारी सुरूच!

बीबीसी कार्यालयात सलग तिसऱ्या दिवशी छापेमारी सुरूच!

बीबीसी या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांवर आयकर विभागाने मंगळवारी छापेमारी केली आणि त्यानंतर देशासह जगभरात या बातमीने खळबळ उडाली. दिल्लीतील बीबीसी कार्यालयात आयकर विभागाची छापेमारी सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. या छापेमारीमुळे कार्यालयातील एकूण 10 कर्मचाऱ्यांना दोन रात्रं कार्यालयातच काढावी लागली. त्याचप्रमाणे बीबीसीच्या काही कर्मचाऱ्यांना घरी जाण्याची परवानगी देखील नाकारण्यात आली. अन्य काही कर्मचाऱ्यांचे फोन देखील क्लोन करण्यात आले आहेत, अशी माहीती समोर आली आहे. (BBC office Raid)

आयकर विभागाच्या सलग तिसऱ्या दिवशीही सुरू असणाऱ्या या छापेमारीमुळे वित्त आणि संपादकीय विभागांसह सुमारे 10 वरिष्ठ बीबीसी कर्मचाऱ्यांना दोन रात्र कार्यलयातच काढावी लागली. त्याचप्रमाणे बीबीसीच्या या कर्मचाऱ्यांना घरी जाण्याची परवानगी देखील नाकारण्यात आली आहे. अन्य काही कर्मचाऱ्यांचे फोन देखील क्लोन करण्यात आल्याची बाब उघडकीस आली आहे.

आयकर विभागाने दिलेल्या माहीतीनुसार, प्राप्तिकर विभाग (IT) 2012 पासून ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या (BBC) दिल्ली आणि मुंबई कार्यालयात खात्यांची तपासणी करत आहे. आयकरची आयटी टीम बीबीसीच्या ब्रॉडकास्ट ऑपरेशनमध्ये कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करत नाही. त्यामुळे बीबीसीने कर्मचाऱ्यांना आयकर विभागाला मदत करण्याचे आवाहन केले आहे. या अनुषंगाने बीबीसीने पुन्हा एकदा आपल्या कर्मचाऱ्यांना तपासात सहकार्य करण्यास सांगितले आहे. त्याचप्रमाणे, ज्या कर्मचाऱ्यांचे संगणक तपासले गेले आहेत त्यांना घरून काम करण्यास सांगितले आहे.

विशेषतः हिंदू सेनेच्या झालेल्या निदर्शनानंतर काल बीबीसी कार्यालयाबाहेर पोलिस तैनात करण्यात आले. याप्रसंगी स्वीडन उप्पसाला विद्यापीठाचे शांतता आणि संघर्ष संशोधनाचे प्राध्यापक अशोक स्वेन यांनी ट्विट केले आहे. ‘भारतातील बीबीसी कार्यालयांवर केवळ मोदी सरकारच छापे टाकत नाही, तर हिंदू वर्चस्ववादीही बीबीसी कार्यालयासमोर निदर्शने करत आहेत’, असे ट्विट करत असमर्थनता दर्शविली आहे.

काही दिवसांपूर्वी बीबीसीने इंडिया : द मोदी क्वेश्चन नावाची 2002 गुजरात दंगलीवर आधारीत एक डॉक्युमेंट्री प्रसारित केली होती. या डॉक्युमेंट्रीवर केंद्र सरकारने भारतात बंदी घातली. तसेच युट्यूबवरुन देखील ती हटविण्यात आली. त्यानंतर आता एकंदरीत विरोधीपक्ष आणि संघटनांनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका करत आहेत.

हे सुद्धा वाचा :

हे कोणत्या लोकशाहीत बसते?, बीबीसीवरील धाडीवर उद्धव ठाकरे संतापले!

बीबीसी कार्यालयांवर झालेल्या आयकर विभागाच्या छापेमारीमागे मोदींचा हात?

आमचे तपास अधिकाऱ्यांना सहकार्य, परिस्थिती शांत होईल अशी आशा करतो; बीबीसीची पहिली प्रतिक्रीया

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी