27 C
Mumbai
Sunday, March 19, 2023
घरमुंबईबीडीडी चाळींच्या परिसरातील पात्र झोपडीधारकांना ३०० स्केअर फुटांचा फ्लॅट मिळणार

बीडीडी चाळींच्या परिसरातील पात्र झोपडीधारकांना ३०० स्केअर फुटांचा फ्लॅट मिळणार

वरळी, नायगाव आणि ना.म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींच्या (BDD chawl) पुनर्बांधणी प्रकल्पाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज आढावा घेतला. यावेळी येथीस पात्र निवासी झोपडीधारकांना (Eligible slum dwellers) सदनिकांचे चटई क्षेत्रफळ २६९ चौरस फुट ऐवजी ३०० चौरस फुट देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच चाळ परिसरातील पात्र निवासी झोपडीधारकांना संक्रमण शिबीराऐवजी मागणी केल्यास दरमहा भाडे देण्याच्या पर्यायास यावेळी मंजुरी देण्यात आली. बीडीडी चाळींच्या कामांना गती देतानाच बांधकाम क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून गुणवत्तापूर्ण काम करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले. (BDD chawl area Eligible slum dwellers will get 300 sq ft flat)

मंत्रालयात झालेल्या या बैठकीस म्हाडाचे व्यवस्थापकीय संचालक व उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर, महसुल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये, मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, पायाभूत सुविधा प्रकल्प वॉर रुम महासंचालक राधेशाम मोपलवार आदी उपस्थित होते.

पहिल्या टप्प्यातील पुनर्विकासाची कामे

यावेळी डिग्गीकर यांनी प्रकल्पांच्या कामांबाबत सादरीकरण केले. वरळी, नायगाव, ना.म. जोशी मार्ग येथे एकूण १५९ बीडीडी चाळी आहेत. वरळी येथील १२१ चाळींपैकी पहिल्या टप्प्यात ३४ चाळी आणि २५२० गाळ्यांचा पुनर्विकास होत आहे. तर नायगाव येथील ४२ पैकी पहिल्या टप्प्यात २३ चाळी आणि १८२४ गाळ्यांची पुनर्बांधणी केली जाणार आहे. ना.म. जोशी मार्ग येथील ३२ चाळींपैकी पहिल्या टप्प्यात १६ चाळी आणि १२८० गाळ्यांचा पुनर्विकास केला जाणार आहे.

  हे सुद्धा वाचा 

बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्प हा आशिया खंडातील सर्वात मोठा प्रकल्प; जाणून घ्या सविस्तर माहिती

शरद पवार यांच्यावर उद्या होणार शस्त्रक्रिया; काही दिवस विश्रांती घेण्याचा डॉक्टरांचा सल्ला

कुणबी जोडो अभियानातून रायगडमध्ये एकटवला कुणबी समाज

रहिवाशांना मिळणार या सुविधा
बीडीडी चाळींच्या पुनर्विकासात रहिवाशांना विविध सोयी मिळणार असून त्यामध्ये व्यायामशाळा, ललित कला भवन, रुग्णालय, शाळा, जॉगींग ट्रॅक, कम्युनिटी हॉल, सिनिअर सिटीजन प्लाझा या सुविधांचा अंतर्भाव नवीन इमारतींमध्ये असणार आहे.

 

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी