32 C
Mumbai
Friday, April 19, 2024
HomeमुंबईBEST : 'बेस्ट'ने सुरु केली प्रवाशांसाठी नवी सुविधा

BEST : ‘बेस्ट’ने सुरु केली प्रवाशांसाठी नवी सुविधा

मुंबईच्या 'लाल परी'ला अर्थात बेस्ट बसला ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. याच निमित्ताने बेस्टने प्रवाशांचा प्रवास आणखी सुखकर व्हावा यासाठी एक नवीन सुविधा सुरु केली आहे.

मुंबईच्या रस्त्यावर धावणाऱ्या ‘बेस्ट’ (BEST) बसने आपल्या सेवेची ७५ वर्षे पूर्ण केली आहेत. रविवारी (ता. ८ ऑगस्ट) मुंबईच्या ‘लाल परी’ला अर्थात बेस्ट बसला ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. याच निमित्ताने बेस्टने प्रवाशांचा प्रवास आणखी सुखकर व्हावा यासाठी एक नवीन सुविधा सुरु केली आहे. मोठ्या उत्साहात बेस्ट प्रशासनाकडून ही पंच्याहत्तरी साजरी करण्यात आली. याचवेळी प्रवाशांच्या सेवेसाठी ‘चलो ऍप’ सुरु करण्यात आला आहे. या ऍपमुळे प्रवाशांना बसमध्ये बसल्यानंतर आता ऑनलाईन तिकीट काढता येणार आहे. पण ‘चलो’ या ऍपच्या माध्यमातूनचं हे तिकीट काढता येणार आहे. याबाबतची माहिती बेस्टकडून देण्यात आली आहे. पेपरलेस तिकीट प्रणालीमुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर होईल, त्याचप्रमाणे या गोष्टीचा प्रवाशांना फायदा देखील होईल, असे देखील बेस्ट प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

BEST : ‘बेस्ट’ने सुरु केली प्रवाशांसाठी नवी सुविधा

Eknath Shinde : ‘प्रत्येक मराठी माणसाचा स्वाभिमान दुखावणारा फोटो’

Breaking : हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा!

बेस्टकडून सुरु करण्यात आलेली चलो ऍपची सेवा प्रवाशांसाठी फायदेशीर ठरणार आहे. पेपरलेस प्रणालीमुळे प्रवाशांना ऑफलाईन सुद्धा ही सुविधा वापरता येणार आहे. चलो ऍप द्वारे पेपरलेस तिकीट काढणे ही भारतातील पहिली ट्रान्सपोर्ट केंद्रित पेमेंट प्रणाली आहे. अशी माहिती बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा यांच्याकडून देण्यात आली आहे.

चलो ऍपचा वापर करण्यासाठी प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी प्रवासी UPI, डेबिट-क्रेडिट कार्ड आणि नेट बँकिंग या सुविधांचा वापर करून चलो ऍपमध्ये वॉलेट रिचार्ज करावा लागेल. यानंतर प्रवासी चलो ऍप मायेंधील पैशांवर प्रवासी आपले तिकीट काढू शकतात. पण चलो ऍपचा वापर करून प्रवाशांना तिकीट काढायचे आहे, याबाबतची माहिती प्रवाशांना कंडक्टरला द्यावी लागेल. प्रवाशांना चलो ऍप मधील स्कॅनरच्या मदतीने कंडक्टरकडे असलेल्या तिकीट मशीनमधील QR कोड स्कॅन करावा लागेल. त्यानंतर या ऍपच्या माध्यमातून प्रवाशांचे तिकीट मोबाईलवर जनरेट होईल, अशी सविस्तर माहिती बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा यांच्याकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, या सुविधेमुळे बेस्टमधून दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि सोपा होईल, असा विश्वास बेस्ट प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी