27 C
Mumbai
Monday, March 20, 2023
घरमुंबईBEST झालं राव: नव्या मेट्रोमुळे बेस्टला आले 'अच्छे दिन'

BEST झालं राव: नव्या मेट्रोमुळे बेस्टला आले ‘अच्छे दिन’

नव्याने सुरू झालेल्या मेट्रो मार्गांवर दररोज 1,800 हून अधिक प्रवासी बेस्ट बसचा वापर करत आहेत.

मुंबईकरांच्या सेवेत नुकत्याच दाखल झालेल्या मेट्रो 2A मुळे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मुंबईतील नव्या मेट्रो मार्गिकेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते शुक्रवारी (20 जानेवारी) उद्घाटन करण्यात आले. अंधेरी ते दहिसर असा हा मार्ग आहे. मुंबई पश्चिम उपनगरात प्रवाशांच्या सेवेसाठी धावणाऱ्या नव्या मेट्रोमुळे बेस्ट (BEST) ला अच्छे दिन आले आहेत. (BEST News: New metro brings ‘Achche Din’ to the BEST)

बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्टेशन (BEST) ने प्रवाशांसाठी 20 जानेवारीपासून मुंबई मेट्रो लाईन 2A (दहिसर ते DN नगर अंधेरी पश्चिम) आणि लाईन 7 (दहिसर ते अंधेरी पूर्व) तीन नवीन बस मार्ग सुरू केले आहेत. या तीनही नवीन मार्गांवर दररोज 1,800 हून अधिक प्रवासी प्रवास करत आहेत आणि ही संख्या आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. ऑपरेटरकडून नवीन बेस्ट बसेस प्राप्त झाल्यावर अधिकतम फेऱ्या आणि अधिक बस सेवा दिल्या जातील.

सध्या मेट्रोलाइनच्या तीनही मार्गावर बेस्टच्या प्रत्येकी तीन बसेस सुरू आहेत. या नऊ वाहनांद्वारे एका दिवसात एकूण 152 फेऱ्या केल्या जातात. 24 जानेवारी रोजी एकूण 1,825 प्रवाशांनी या सेवांचा लाभ घेतला आणि 9,696 रुपयांची कमाई झाली, अशी माहिती बेस्ट परिवहन अधिकाऱ्यानी दिली.

हे सुद्धा वाचा : सर्वसामान्य मुंबईकरांसाठी आज दुपारी 4 वाजेपासून खुली होणार नव्या मेट्रो मार्गांवरील सेवा

BEST : ‘बेस्ट’ने सुरु केली प्रवाशांसाठी नवी सुविधा

मेट्रो 2 अ प्रकल्पातील कामचुकार कंत्राटदारांना केवळ 36 लाखांचा दंड; माहिती अधिकारातून बाब उघड

परिवहन उपक्रमानुसार, या बसेस प्रत्येक मार्गावर 20-25 मिनिटांच्या अंतराने धावतात. नॉन-एसी बससाठी 5 किमीसाठी किमान भाडे 5 रुपये आहे आणि एसी बसच्या बाबतीत त्याच अंतरासाठी 6 रुपये आकरले जातात. बेस्ट मासिक पास आणि ‘चलो ॲप’ Chalo Appद्वारे तिकीट बुक करणाऱ्यांना विविध सवलती देखील दिल्या जातात.

बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र म्हणाले, “मेट्रो लाईन्स 2A आणि 7 ने दररोज लाखो प्रवाशांची वाहतूक करणे अपेक्षित आहे आणि आधीच दररोज एक लाखाहून अधिक प्रवासी दिसत असल्याने, नवीन मेट्रो मार्गांवर बेस्टद्वारे चालवल्या जाणाऱ्या बसेस देखील हळूहळू दिसतील आणि रायडरशिपमध्ये वाढ होईल. मेट्रो प्रवाशांसाठी बसेस फीडर मार्ग म्हणून काम करत आहेत.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी