29 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमुंबईआनंदाची बातमी ! गणेश दर्शनासाठी बेस्टची वातानुकूलित 'हो हो' बस सेवा

आनंदाची बातमी ! गणेश दर्शनासाठी बेस्टची वातानुकूलित ‘हो हो’ बस सेवा

गणेशोत्सवादरम्यान गणेश भक्तांना सार्वजनिक गणपतीचे दर्शन सुलभ रीतीने करता यावे, याकरिता बेस्ट उपक्रमाने रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत खुल्या दुमजली बस गाड्यांची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. गणेश भक्तांचा वाढता उत्साह आणि खुल्या दुमजली बस गाड्यांना चांगला उदंड प्रतिसाद मिळत आहे.

दीड दिवसांच्या गणपतींचे नुकतेच विसर्जन झाले आता पाच दिवसांचे गणपती आणि गौरींचे विसर्जन झाल्यावर सार्वजनिक गणेशोत्सव (Ganesh Ustav) मंडळातील मोठमोठे गणपती पाहण्यासाठी गणेश भक्तांची गर्दी वाढणार आहे. ही गणेश भक्तांची वाढणारी गर्दी त्यात खुल्या दुमजली बस गाड्यांना मिळालेला उदंड प्रतिसाद पाहून बेस्ट उपक्रमाने आता वातानुकूलित ‘हो-हो’ बस सेवा सुरू केली आहे. या बस गाडया गणेश भक्तांच्या सेवेकरीता दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व गणेश भक्तांनी या ‘हो हो’ बससेवेचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन बेस्ट कडून करण्यात आले आहे.

आनंदाची बातमी ! गणेश दर्शनासाठी बेस्टची वातानुकूलित 'हो हो' बस सेवा

 

हे सुद्धा वाचा

Marathi movies : ‘रुप नगर के चिते’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मंत्रालयात जनावरांचे डॉक्टर !

Sharad Pawar शरद पवारांच्या लाडक्या आमदाराने चालवली एसटी

गणेशोत्सवादरम्यान गणेश भक्तांना सार्वजनिक गणपतीचे दर्शन सुलभ रीतीने करता यावे, याकरिता बेस्ट उपक्रमाने रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत खुल्या दुमजली बस गाड्यांची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. गणेश भक्तांचा वाढता उत्साह आणि खुल्या दुमजली बस गाड्यांना चांगला उदंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमाने आता वातानुकूलित हो-हो बस सेवा गणेश भक्तांच्या सेवेकरीता दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘हो हो’ बस सेवा 3 सप्टेंबर 2022 ते 8 सप्टेंबर 2022 रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत दर 25 मिनीटांच्या अंतराने चालविण्यात येणार आहेत.

या बसगाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणार आहेत. त्या मेट्रो, गिरगाव चर्च, प्रार्थना समाज, ताडदेव, नागपाडा भायखळा रेल्वे स्थानक पूर्व, जिजामाता उद्यान, लालबाग, हिंदमाता, दादर रेल्वे स्थानक पूर्व, दादर टीटी या ठिकाणाहून वडाळा बस आगारापर्यंत चालवल्या जाणार आहेत. सदर बस सेवेकरिता केवळ 60 रुपये इतक्या दराचा बसपास उपलब्ध होणार आहे. यामध्ये साधी, मर्यादित तसेच वातानुकूलित बसगाडीतून प्रवासाकरिता सदर पास वैध राहणार आहे. परंतु, खुल्या दुमजली बस गाडीसाठी वैध नसेल.

सदर बससेवा गणेश भक्तांना एका ठिकाणी उतरून गणेश दर्शनानंतर पुन्हा पुढील ठिकाणी गणेश दर्शनासाठी जाण्याकरिता उपलब्ध असणार आहे.

अधिक माहिती करता प्रवाशांनी कृपया १००२२७५५० या टोल फ्री क्रमांकावर किंवा ०२२२४१९०११७ या क्रमांकावर संपर्क साधावा.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी