29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
HomeमुंबईBMC : मनपाच्या मुख्य लिपीक परिक्षेमध्ये मोठा घोटाळा, नापास उमेदवारांना केले पास

BMC : मनपाच्या मुख्य लिपीक परिक्षेमध्ये मोठा घोटाळा, नापास उमेदवारांना केले पास

मुंबई महानगर पालिकेमध्ये झालेल्या वरिष्ठ लिपीक परिक्षेमध्ये झालेला घोटाळा उघड झाला आहे. या परिक्षेमध्ये नापास झालेल्या उमेदवारांना रिचेकींगमध्ये पास करण्यात आले आहे. पास करण्यासाठी मोठी रक्कम घेण्यात आली आहे.

मुंबई महानगर पालिकेमध्ये झालेल्या वरिष्ठ लिपीक परिक्षेमध्ये झालेला घोटाळा उघड झाला आहे. या परिक्षेमध्ये नापास झालेल्या उमेदवारांना रिचेकींगमध्ये पास करण्यात आले आहे. पास करण्यासाठी मोठी रक्कम घेण्यात आली आहे. रिचेकींग करुन पास करण्यासाठी मोठी रक्कम घेतल्याचा आरोप म्युनसिपल मजूदर युनियनने केला आहे. बीएमस कमिशनर इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय कुमार यांना पत्र पाठवून ही परीक्षा रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे. ही परिक्षा जीएडी विभागाचे कमिशनर मिलींद सावंत यांच्या निरीक्षणाखाली घेण्यात आली होती.

ही गोष्ट इतकी गंभीर आहे की, मुख्य परीक्षेमध्ये नापास झालेल्या उमेदवारांनी लाखो रुपये देऊन पेपर रिचेकींग करुन घेतले. त्यानंतर ते उमेदवार 10 ते 15 नंबर देऊन पास झाले. आशा प्रकारे 202 उमेदवारांना पास करण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली आहे. ज्या उमेदवारांनी पैसे दिले नाहीत त्यांना जाणीवपूर्वक मागचा नंबर देण्यात आला असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. म्युनसिपल मजदूर यूनियनने या विषयीचे पत्र बीएमसी कमिशनरला दिले आहे. बीएमसी मुख लिपीक परीक्षा जुलैमध्ये घेण्यात आली होती.

हे सुद्धा वाचा

‘जागतिक दहशतवादी’ दाऊद इब्राहिम याच्यावर राष्ट्रीय अन्वेषण अभिकरणाने (NIA) २५ लाखांचे बक्षीस जाहीर केले

Ashok Chavan : अशोक चव्हाण – देवेंद्र फडणवीस भेट, अन् इन्कम टॅक्सची धाड !

BJP : ‘कमळाबाईमध्ये आई, ताई व कडक लक्ष्मी सुद्धा आहे’

ही परीक्षा मुख्य लिप‍िक, वरिष्ठ लेखापाल तसेच सहाय्यक लेखापाल पदांसाठी होती. म्युनसिपल मजदूर यूनियनचे सहाय्यक सचिव शैलेंद्र खानविलकर यांनी सांगितले की, सुमारे 250 पदांसाठी 3000 उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती. या निकालामध्ये 337 उमेदवार पास‍ झाले. मेन परीक्षेमध्ये नापास झालेल्या उमेदवारांनी बीएमसीला र‍िचेकींगसाठी पत्र लिहले. ही परीक्षा महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाकडून घेण्यात आली होती. रिचेकींगनंतर उमेदवारांना पास करण्यात आले. त्यासाठी प्रत्येक उमेदवारांकडून मोठी रक्कम आकारण्यात आली होती.

BMC : मनपाच्या मुख्य लिपीक परिक्षेमध्ये मोठा घोटाळा, नापास उमेदवारांना केले पास

या मेन परिक्षेमध्ये एका बीएमसी कर्मचाऱ्यांच्या मूलाचा देखील समावेश आहे. त्याचा क्रमांक 419 होता. त्याला 0 नंबर मिळाला होता.‍ रिचेकींगनंतर त्याला 15 नंबर देण्यात आल्याचा आरोप युनिययने लावला आहे. युनियनचे सहाय्यक सचिव शैलेंद्र खानव‍िलकर यांनी बीएमसी कमिशनर इक्बाल सिंह चह आणि अतिरिक्त महानगर पालिका आयुक्त यांना पत्र लिहून ही परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे.

खानविलकर यांनी सांगितले की, या वरिष्ठ लिपीक पदाच्या परीक्षेमध्ये मोठया प्रमाणात‍ घोटाळा झाला आहे. उमेदवारांना पास करण्यासाठी मोठी रक्कम घेण्यात आली आहे. रिचेकिंग करणारे डोळेबंद करुन पेपर तपासतात. त्यामुळे महानगर पालिकेवरचा भरोसा उडाला आहे. नापास विद्यार्थ्यांपैकी 202 उमेदवारांना पास करण्यात आले. हा खूप मोठा भ्रष्टाचार आहे. यामुळे परीक्षा रद्द करुन पुन्हा परीक्षा घेण्यात यावी.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी