31 C
Mumbai
Wednesday, May 24, 2023
घरमुंबईपुण्याची ताकद 'गिरीश बापट' यांनी घेतला अखेरचा श्वास

पुण्याची ताकद ‘गिरीश बापट’ यांनी घेतला अखेरचा श्वास

पुण्यातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. भाजप खासदार गिरीश बापट यांचे प्रदीर्घ आजारामुळे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून असा परिवार आहे. पुण्याच्या राजकारणात ‘भाऊ’ म्हणून ओळखले जाणारे गिरीश बापट यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. आज वयाच्या 82व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गिरीश बापट यांच्या निधनानं महाराष्ट्रात राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.

भाजपच्या जुन्या फळीतील नेत्यांपैकी एक म्हणून बापट ओळखले जातात. पुण्यात भाजप वाढवण्यात गिरीश बापट यांचे महत्त्वाचे योगदान आहे. तसेच त्यांनी सर्व पक्षातील नेत्यांशी चांगले संबंध ठेवले होते. काही दिवसापूर्वी बापट यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. मात्र ऑक्सिजनची श्वसन नलिका त्यांना लावलेली होती. अशा परिस्थितही बापट यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी कसबा कार्यालय गाठलं होतं.

पुण्याची ताकद 'गिरीश बापट' यांनी घेतला अखेरचा श्वास

अनेक वर्षांपासून ते राजकारणात सक्रिय होते. कायम पक्षाशी एकनिष्ठ होते. त्यांनी भेटलेल्या कार्यकर्त्यांची नेहमीप्रमाणे विचारपूस केली. यामुळे कार्यकर्ते कमालीचे आनंदी झाले होते. त्यावेळी ‘पुण्याची ताकद, गिरीश बापट’ या घोषणेने परिसर अक्षरशः दणाणून निघाला होता. कार्यकर्त्यांमध्ये कट्ट्यावर बसून गप्पांचा फड रंगविण्याची त्यांची हातोटी होती. पुणे जिल्ह्यात शरद पवारांचे वर्चस्व असताना बापट यांनी आपले अढळ स्थान निर्माण केले. आमदार, खासदार मंत्री अशी अनेक पदे त्यांनी भूषवली होती.

हे सुद्धा वाचा :

‘महाशक्ति’ने पुण्याचा केला बिहार; धंगेकरांना विजयापासून रोखण्यासाठी पोलिस-सरकारी यंत्रणेचा गैरवापर; मीडियाची अळीमिळी-गुपचिळी!

भविष्यात काँग्रेसला सोडचिट्ठी देणार का? रवींद्र धंगेकर म्हणाले…

Maharashtra Budget 2023 : ‘पुणे रिंग रोड ते पुरंदर विमानतळ’ वाचा कशासाठी किती कोटींची तरतूद

राजकारणात आल्यानंतर त्यांच्यासोबत काम करताना खूप अनुभव आला. सामान्य माणसांकडे पाहण्याचा दृष्टीकोन त्यांनी अनेकांना दिला. सगळ्या आमदारांची नियमित बैठका, त्यांच्या अडीअडचणी समजून घेण्याची त्यांची सातत्याची भूमिका होती. ते सर्वपक्षीय मित्र होते. वेगवेगळ्या पक्षांशी वाटाघाटी करून अनेक निवडणुका लढवल्या. बापट यांचं जाणं पक्षासाठी मोठे नुकसान आहे. कुठल्याही स्तरातील कार्यकर्त्यांसोबत व्यक्तीसोबत मैत्री जोडणे आणि त्यांची चूक सहजपणे जाणवून द्यायचे ही त्यांची खुबी होती त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
– विनोद तावडे, भाजपा राष्ट्रीय नेते

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी