30 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
Homeमुंबईभाजपचे नेते ‘बांधणी‘ करत होते; तेव्हा महाविकास आघाडीचे नेते ‘झोपा‘ काढत होते...

भाजपचे नेते ‘बांधणी‘ करत होते; तेव्हा महाविकास आघाडीचे नेते ‘झोपा‘ काढत होते !

टीम लय भारी

मुंबई : राज्यसभेची निवडणूक चांगलीच गाजली. त्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुकीत नाट्यमय घाडामोडी घडल्या. राज्यसभेच्या निकालानंतर विधान परिषदेच्या निवडणुकीत आपलाच विजय निश्चित आहे, असे वक्तव्य भाजपच्या अनेक नेत्यांनी केले होते. ते आत्मविश्वासाने सांगते होते की, महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार आणि भाजपचे सरकार पुन्हा येणार. ते छातीठोकपणे सांगत होते, गेल्या दोन वर्षांपासून महाविकास आघाडीचे सरकार काय करत होते? हाच खरा प्रश्न या निमत्ताने उपस्थित झाला आहे.

विधान परिषदेच्या निकालानंतर शिवसेनेमध्ये असलेली अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली. मतदानाला येतांना देखील शिवसेनेत ‘दोन‘ गट आहेत हे समोर आले. कारण मतदानाला येतानाच आदित्य ठाकरे यांचा एक गट दिसला. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचा स्वतंत्र गट दिसला. तोच दुसरा गट या नाराजी नाट्यात सहभागी असल्याचे बोलले जात आहे.

एकनाथ शिंदेंनी नाराज गटाला घेऊन विमानाने सुरत गाठले. ही घटना एका दिवसात घडणे शक्य नाही. ही अंतर्गत धुसफूस मोक्याच्यावेळी उफाळून आली. निष्ठावान नेत्याच्या मनात नेमकी कोणती खदखद आहे. याकडे उध्दव ठाकरेंनी लक्ष द्यायला हवे होते. संजय राऊतांना मी म्हणजेच ‘शिवसेना‘ असे वाटते. त्यामुळे अनेक शिवसैनिकांची मनं दुखावली गेली. हे देखील एक कारण होवू शकते.

एकनाथ शिंदेंना मंत्रीमंडळात उपमुख्यमंत्रीपद मिळेल अशी आशा होती. मात्र तसे न होता अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद मिळाले. त्यामुळे अगोदरच एकनाथ शिंदे दुखावले गेले होते. ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळात एकनाथ शिंदेंना ‘खड्या‘सारखे बाजूला काढले होते. त्यामुळे हे नाराजी नाट्य रंगले. रोजच सकाळी माध्यमांसमोर येवून उणीदुणी काढणारे संजय राऊत इतका मोठा दगा फटका होईपर्यंत झोपले होते का? इतरांच्या उणीवा दाखवत बसण्यापेक्षा पक्षातील नेत्यांच्या जाणीवा त्यांना व्हायला हव्या होत्या.

महाविकास आघाडी सरकार हे रा. काॅंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार चालवतात. त्यांची ओळख ‘तेल लावलेला पहेलवान’ अशी आहे. मात्र यावेळी त्यांच्या हातातून हा गडी जोरदार मुसंडी मारून सुटला. त्यांनी थेट गुजरात गाठले. एकनाथ शिंदेंनी एकाकी गुजरात गाठणे शक्य नव्हते. या विषयीचे कपट कारस्थान अगोदरच दिल्ली दरबारी शिजलेले होते हे या घटनेवरुन स्पष्ट झाले आहे. आपल्या सरकारमधील नेते कोणाला भेटतात? नेमके कुठे जातात? काय करतात? त्यांचे कोणाशी हितसंबंध आहेत? याची कुणकुण कोणालच नव्हती का? ठाकरे सरकारचे गर्व हरण करण्यासाठी स्वपक्षीयांनी हे बंड पुकारले! हा शिवसेनेसाठी विचार मंथन करण्याचा विषय आहे.

महाविकास आघाडीचे सरकार हे तीन चाकांचे सरकार आहे. ते कधीही कोसळू शकते. शरद पवारांच्या ‘बुध्दी बळा‘वर अजित पवार हे सरकार चालवतात. मात्र यावेळी बुध्दीबळाचा डाव पलटला. मुख्यमंत्री कोरोना काळात बाहेर पडले नाही. त्यानंतर आजारी पडले म्हणून बाहेर पडले नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्यातल्या लोकांचे आवडते नेते बनले. अजित दादा लोकांचे काम करतात हिच प्रतिमा लोकांच्या आणि विरोधी पक्षातील नेत्यांच्या मनावर कोरली गेली. या कारणांमुळे देखील शिवसेनेचे निष्ठावान नेते दुखावले गेले.

हे सुद्धा वाचा :

शरद पवार म्हणाले, सरकार वाचवविण्याची जबाबदारी उद्धव ठाकरेंची

एकनाथ शिंदे निष्ठावंत शिवसैनिक, ते शिवसेना सोडणार नाहीत : संजय राऊत

Super EXCLUSIVE : फुटलेल्या गटातील 22 आमदारांना मिळणार मंत्रीपदे, 36 आमदार फुटले !

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी