29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
HomeमुंबईUddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना अडचणीत आणण्यासाठी भाजपची नवी खेळी

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना अडचणीत आणण्यासाठी भाजपची नवी खेळी

मुंबई महापालिकेमध्ये विविध प्रकारचे घोटाळे झाले आहेत. कोविड सेंटर घोटाळा, रस्त्यांची गुणवत्ता, सफाई कामगारांना घरे देण्याच्या योजनांमध्ये भ्रष्टाचार झाला आहे. कर्मचाऱ्यांनी स्वत:च्या कंपन्या सुरु करून महापालिकेची कंत्राटे लाटत लूट केली आहे.

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार सर्वश्रुत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांनी हा विषय लावून धरला आहे. त्यामुळे आता मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी फडणवीस करणार आहेत. त्यांच्या या घोषणेचे भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्याकडून स्वागत करण्यात आले. मुंबई महापालिकेमध्ये विविध ठिकाणी भ्रष्टाचार झाल्याची तक्रार भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एका पत्रकाद्वारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. गेल्या अडीच वर्षांपासून महापालिकेमध्ये मनामानी सुरू आहे. ती दूर करण्याचे वचन फडणवीसांनी दिले. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे असे, मत केशव उपाध्ये यांनी मांडले.

मुंबई महापालिकेमध्ये विविध प्रकारचे घोटाळे झाले आहेत. कोविड सेंटर घोटाळा, रस्त्यांची गुणवत्ता, सफाई कामगारांना घरे देण्याच्या योजनांमध्ये भ्रष्टाचार झाला आहे. कर्मचाऱ्यांनी स्वत:च्या कंपन्या सुरु करून महापालिकेची कंत्राटे लाटत लूट केली आहे. अशा अनेक मुद्द्यांवर बुधवारी विधानसभेत आमदारांनी केलेल्या तक्रारींची दखल घेण्यात आली. त्याचप्रमाणे विविध भ्रष्टाचारांच्या आरोपासंदर्भात  महालेखापरीक्षण करून, भ्रष्टाचार समूळ उपटून टाकण्यासाठी हे सरकार प्रयत्न करेल असे केशव उपाध्ये यांना वाटते.

हे सुद्धा वाचा

VIDEO : अष्टविनायक दर्शन – पहिला गणपती मोरगावचा ‘मोरेश्वर’

Terrorist : दहशतवादी केवळ 30 हजार रुपयांत उडवणार होते भारतातील पोस्ट ऑफ‍िस

Aam Aadmi Party : आता ‘आम आदमी पार्टी’च्या 40 आमदारांवर भाजपची वाईट नजर, प्रत्येकी 20 कोटींची ऑफर

महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना मालकी हक्काची घरे देऊ नयेत असा निर्णय ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारने घेतला होता. या आश्रय योजनेतून मालकी हक्कांची घरे दयाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. 29 हजार सफाई कर्मचाऱ्यांच्या मालकीच्या घरांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला आहे. त्यामुळे कामगार खुश झाले आहेत. गिरणी कामगारांच्या घरांचा रखडलेला प्रश्न देखील लवकरच मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गिरणी कामगारांना 50 हजार घरे देण्यात येणार आहेत.

पोलिस गृहनिर्माण योजनेतून पोलिसांकरीता घरे उभारण्यात येणार आहेत. बीडीडी चाळीतील सामान्य कुटुंबांतील नागरिकांना 50 लाख रुपये आकारण्याचा निर्णय बदलून या सरकारने 25 लाखाहून कमी किमतीमध्ये घरे देणारी योजना आखली असल्याचे संकेत देखील केशव उपाध्ये यांनी दिले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही प्रकरणे मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यामुळे त्यांचे केशव उपाध्ये यांनी आभार मानले. धरावी पुनर्विकास प्रकल्पास गती देण्यासाठी शिंदे फडणवीस सरकारने सकारात्मक पावले उचलली आहेत. तसेच रेल्वे हद्दीतील जागेचा प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू केल्याने हा प्रश्न देखील लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी