28 C
Mumbai
Friday, September 22, 2023
घरमुंबईबीएमसीकडून मशीन वाटपाच्या कार्यक्रमावर कोट्यवधींचा खर्च; चौकशी करण्याची मागणी

बीएमसीकडून मशीन वाटपाच्या कार्यक्रमावर कोट्यवधींचा खर्च; चौकशी करण्याची मागणी

मुंबई महानगरपालिकेतर्फे नुकताच शिलाई मशीन, घरघंटी मशीन आणि मसाला कांडप मशीन वाटप योजनेचा शुभारंभ चुनाभट्टी येथील सोमय्या मैदानात झाला होता. या आयोजनावर महापालिकेने 1.94 कोटी खर्च केल्याची माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते (आरटीआय) अनिल गलगली यांस मुंबई महानगरपालिकेच्या ‘एफ’ उत्तर वॉर्ड कार्यालयाने दिली आहे. तर हा आयोजनाचा खर्च अवाढव्य असून याची चौकशी करणे आवश्यक असल्याचे गलगली यांनी म्हटले आहे.

अनिल गलगली यांनी मुंबई महापालिकेकडे शिलाई मशीन, घरघंटी मशीन आणि मसाला कांडप मशीन वाटपाच्या कार्यक्रमाकरिता करण्यात आलेल्या खर्चाची माहिती मागितली होती. त्यावर महापालिकेच्या ‘एफ’ उत्तर वॉर्ड कार्यालयाने अनिल गलगली यांना कळविले की, चुनाभट्टी येथे आयोजित करण्यात आलेल्या शिलाई मशीन, घरघंटी मशीन आणि मसाला कांडप मशीन वाटपाच्या कार्यक्रमाकरिता कंत्राटदार मे. जेस आयडियाज प्रायव्हेट लिमिटेड (मंडप, स्टेज, टेबल, खुर्च्या कारपेट, पाणी, अल्पोपहार, इत्यादि कामाकरिता) व मे. एस बी इंटरप्रायजेस (एलईडी लाइट, प्रकाशयोजना, ध्वनियंत्रणा, जनरेटर फॅन, कूलर, फोटोशूटिंग, विडियो, इत्यादि कामाकरिता) यांना नियुक्त करण्यात आलेले होते.
या कामाकरिता निधि उपलब्ध झाला नसल्याने कंत्राटदारांना अद्यापपर्यन्त कामाचे अधिदान करणे बाकी आहे. सदर कार्यक्रमाकरिता एकूण 1 कोटी 93 लाख 76 हजार 500 रुपये कमेची प्रशासकीय मान्यता घेण्यात आली आहे, असे देखील महापालिकेच्या एफ उत्तर कार्यालयाने कळविले आहे.

हे सुद्धा वाचा 
ज्येष्ठ लेखक, पत्रकार आणि कथाकथनकार शिरीष कणेकर यांचे निधन

जयंत पाटील यांना 580 कोटी निधी मिळाल्याच्या बातमीचा फुसका बार, किती रक्कम मिळाली ते विधानसभेत जाहीरच केले

त्र्यंबकेश्वर मंदिरातील परंपरा तपासून घ्या – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

एकाच कार्यक्रमात कोटयावधी रुपये आयोजनासाठी उधळले गेले असल्याची खंत अनिल गलगली यांनी व्यक्त केली आहे. अनिल गलगली यांनी आयोजनाचा खर्च अवाढव्य असून याची चौकशी करणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. कारण महापालिकेकडून अशा मशीनचे प्रभाग स्तरावर कोणताही खर्च न करता मोफत वाटप करण्यात येत आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी