34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
HomeमुंबईBMC Election 2022: उद्धव ठाकरेंनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला

BMC Election 2022: उद्धव ठाकरेंनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला

भारतीय जनता पक्षाचे (BJP) वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) गणेशोत्सवाच्या निमित्ताने काल मुंबईत दाखल झाले. मुबंईतील पक्षाचे पदाधिकारी आणि आमदारांना संबोधित करताना शिवसेना (Shivsena) प्रमुख उद्धव ठाकरें पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) आमच्या पाठीत खंजीर खुपसला म्हणून जनतेने त्यांना त्यांची योग्य ती जागा दाखवावी अशी घणाघाती टीका केली.

भारतीय जनता पक्षाचे (BJP) वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) गणेशोत्सवाच्या निमित्ताने काल मुंबईत दाखल झाले. मुबंईतील पक्षाचे पदाधिकारी आणि आमदारांना संबोधित करताना शिवसेना (Shivsena) प्रमुख उद्धव ठाकरें पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) आमच्या पाठीत खंजीर खुपसला म्हणून जनतेने त्यांना त्यांची योग्य ती जागा दाखवावी अशी घणाघाती टीका केली. अमित शाह गणेशोत्सवानिमित्त मुंबईमध्ये दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. आज त्यांनी लालबागचा राजा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यातील गणरायाचे दर्शन घेतले.

अमित शाह हे मुंबईत मध्ये गणेशदर्शनासाठी आले असले तरी त्यांचा मुख्य उद्देश्य हा आगामी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूकीची मोर्चेबांधणी करण्याचा आहे असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधताना शाहनीं उद्धव ठाकरेंचा खरा चेहरा लोकांसमोर आणण्याचे आवाहन केले. उद्धव ठाकरेंनी २०१९ महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकीच्या निकालानंतर सत्ता उपभोगण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी हातमिळवणी करून फक्त आमच्या पाठीत खंजीर खुपसला नाहीतर आपल्या मूळ विचारधारेशी सुद्धा फारकत घेतली. निवडणूकीपूर्वी त्यांनी आमच्या पक्षाची युती केली होती त्यामुळे जनतेने त्यांना मते दिली परंतु, निवडणूकीच्या निकालानंतर स्वार्थीपणाने सत्ता उपभोगण्याच्या हव्यासापायी त्यांनी जनतेचा सुद्धा विश्वासघात केला आहे. त्यांच्या हया कृत्याबदद्ल त्यांना जनतेने धडा शिकवणे गरजेचे आहे.

त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना आगामी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूकीसाठी आपले सर्वस्व पणाला लावण्याचे आवाहन केले. त्यांनी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आगामी निवडणूकीत पक्षाला १५० जागा मिळतील त्या उद्देश्याने जोमाने काम करण्याच्या सूचना दिल्या.

हे सुद्धा वाचा –

Asia Cup 2022: खेळात चुक होणे ही स्वाभाविक गोष्ट; विराट कोहलीने केली अर्शदीप सिंहची पाठराखण

5G Spectrum Auction: जाणून घ्या कोणत्या शहरांमध्ये 5G सेवांना होणार सर्वप्रथम सुरूवात

Dhananjay Munde : धनंजय मुंडे धावले अडचणीत आलेल्यांच्या मदतीसाठी

यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हया निवडणूकीच्या निकालानंतर खरा चाणक्य कोण आहे हे जनतेच्या लक्षात येईल. पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने वरिष्ठांच्या आदेशाची वाट न पाहता जोमाने काम करण्याची गरज आहे जेणेकरून मुंबई महानगपालिकेला भारतीय जनता पक्षाचा महापौर मिळेल.  ‍

मुंबई महानगर पालिकेच्या सन २०१७ मध्ये झालेल्या निवडणूकीत एकूण २२७ जागांपैकी भारतीय जनता पक्षाने ८२ जागा जिंकल्या होत्या आणि शिवसेनेला ८४ जागा जिंकण्यात यश आले होते.

आमचे युटयूब चॅनेल सुद्धा सबस्क्राइब करा –

अश्विन शेश्वरे
अश्विन शेश्वरेhttp://laybhari.in
He writes about National and Maharashtra Politics, Education, Health, Civic, Legal, Crime and Sports beat for LayBhari News.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी