34 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
HomeमुंबईBMC Exclusive : शौचालयात कपडे धुवा, मोबाईल चार्जिंग करा आणि एटीएमने पैसेही...

BMC Exclusive : शौचालयात कपडे धुवा, मोबाईल चार्जिंग करा आणि एटीएमने पैसेही काढा

सुविधासंपन्न सुविधा शौचालय झोपड्पट्टीवस्तीला लागून असलेल्या रस्त्याच्या कडेला उभारण्यात येणार आहेत. याचा फायदा झोपडपट्टी रहिवाशांसाठी आणि पदपथावरून जाणाऱ्या नागरिकांसाठी उपयोगी ठरणार आहेत.

तुमचे कपडे अस्वच्छ आहेत तर तुम्ही शौचालयात जा आणि तेथील लॉन्ड्रीमध्ये जाऊन तुम्ही तुमचे कपडे स्वच्छ धुऊन घ्या. इतकेच काय तर तुमच्या मोबाईलला चार्ज करायचे असेल तरी सुद्धा तुम्ही शौचालयात जाऊन मोबाईल चार्जिंग करू शकता. प्यूरिफायर पाणी (शुद्ध पाणी करणारी यंत्रणा) आणि एटीएमची सुविधा देखील आता तुम्हाला शौचालयातच मिळणार आहे. ऐकून धक्का बसला असेल नाही का? पण हे खरे आहे. असे सुविधासंपन्न सुविधा शौचालय झोपड्पट्टीवस्तीला लागून असलेल्या रस्त्याच्या कडेला उभारण्यात येणार आहेत. याचा फायदा झोपडपट्टी रहिवाशांसाठी आणि पदपथावरून जाणाऱ्या नागरिकांसाठी उपयोगी ठरणार आहेत, असा महापालिकेकडून दावा करण्यात येत आहे.

मुंबईतील झोपडपट्टीवस्तीत मुंबई महापालिकेतर्फे सामुदायिक शौचालय उभारण्यात आलेले आहेत. सामुदायिक शौचालयाचा वापर झोपडपट्टीवस्तीतील रहिवाशी करत आहे. सामुदायिक शौचालय वस्तीपातळीवरील संस्थाकडून चालविले जाते. शौचालय वापरण्यासाठी एका घरामागे मासिक पासकरीता 40 ते 100 रुपये खर्च करावे लागतात. हे सामुदायिक शौचालय झोपडपट्टीवस्तीत उभारण्यात आल्यामुळे याचा लाभ केवळ झोपडपट्टीतील रहिवाश्यांना मिळतो.

हे सुद्धा वाचा…

Ratan Tata : ‘हे’ ॲप्स तयार करण्यात रतन टाटांचे मोठे योगदान

Ronaldo Retirement : ‘रोनाल्डोचा फुटबॉलला रामराम!’ मोठी अपडेट आली समोर

Big Boss 16 : बिग बॉस 16 मध्ये मिस इंडिया उपविजेती पसरवणार सौंदर्याची जादू

मात्र आता पदपथावरून चालणाऱ्या पादचाऱ्यांना आणि झोपडपट्टीतील रहिवाशांना एकत्रीत शौचालयाचा लाभ मिळावा या हेतून महापालिकेकडून झोपडपट्टीवस्तीला लागून असलेल्या रस्त्यावर सुविधा शौचालय उभारण्यात येणार आहेत. हे सुविधा शौचालय पूर्णतः सौरऊर्जेवर चालणारे असणार आहेत. सौरऊर्जेवर चालणाऱ्या या सुविधांमुळे शौचालयात मोबाईल चार्जिंगची सोय उपलब्ध होणार आहे. प्यूरिफाईड पाणी ( शुद्ध पाणी करणारी यंत्रणा ) सोबतच येथे कपडे धुण्यासाठी लॉन्ड्रीची ही सोय असणार आहे. या लॉन्ड्री मध्ये कपडे धुण्याची सोय असणार आहे.

या सर्व यंत्रणेवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा बसवून नियंत्रण ठेवले जाणार आहे. याच सुविधा शौचालयांच्या बाजूलाच लागून असलेल्या जागेत एटीएम मशीनची सुविधा देखील असणार आहे. सदर सुविधांचा लाभ घेण्यासाठी शुल्क आकारण्यात येणार आहेत. झोपडपट्टीत राहणाऱ्या रहिवाशांना याचा लाभ घ्यायचा असल्यास त्यांना मासिक पासची सोय करून देण्यात आलेली आहे, या पाससाठी 40 ते 100 रुपये इतकाच खर्च अपेक्षित आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या कोणाला या सुविधांचा वापर करायचा असल्यास त्यांना सुद्धा ठराविक शुल्क आकारले जाणार आहे.

अशाप्रकारे सुविधा संपन्न एक सुविधा शौचालय बांधण्यासाठी 2 करोड 75 लाख रुपये खर्च होणार आहे. सुरुवातीला 30 शौचालय उभारण्यात येणार आहेत. सुविधा शौचालयाला मिळणारा प्रतिसाद पाहून पुढे आणखी सुविधा शौचालय उभारण्यात येणार आहेत, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी लय भारीशी बोलताना सांगितले. सध्या सामुदायिक शौचालय वस्तीपातळीवरील संस्थाकडून चालविले जाते आहे, मात्र सुविधा शौचालय हे सामाजिक संस्थाकडून चालविले जाणार आहेत. येत्या दीड महिन्यात सुविधा शौचालय उभारण्यासाठी निविदा काढण्यात येणार आहेत. त्यानंतर पुढील 6 महिन्यात सुविधा शौचालय उभारले जातील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी