34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमुंबईमहाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमाकडे पालकांची पाठ ; महापालिकेच्या 'सीबीएससी', 'आयसीएससी'च्या ८६८ जागांसाठी चार...

महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमाकडे पालकांची पाठ ; महापालिकेच्या ‘सीबीएससी’, ‘आयसीएससी’च्या ८६८ जागांसाठी चार हजारपेक्षा अधिक अर्ज

महापालिकेच्या शाळांमधील ‘सीबीएससी‘च्या (‘सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एजुकेशन’) ‘आयसीएससी’च्या (‘इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एजुकेशन’) अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांच्या पालकांनी पसंती दर्शविली असून ८६८ जागांसाठी तब्बल चार हजार अर्ज जमा झाले आहेत. २०२३-२४ या शैक्षाणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया मागील आठवड्यात पूर्ण झाली. या प्रवेश प्रक्रियेला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून या सर्वांनाच प्रवेश मिळणं शक्य नसल्याकारणाने लॉटरी पद्धतीनुसार प्रवेश देण्यात येणार आहेत. एकंदरीतच ‘सीबीएससी’ आणि ‘आयसीएससी’ बोर्डाकडे पालकांचा कल वाढत असल्याचे दिसत आहे. (BMC gets over 4,000 applications for civic-run schools : Only 868 seats)

मागील वर्षीप्रमाणे यंदाही महापालिकेच्या शाळांमध्ये प्रवेश मिळण्यासाठी पालकांची झुंबड उडाली आहे. भविष्यातील जीवघेण्या स्पर्धेत आपल्या पाल्याचा टिकाव लागावा म्हणून ‘आयसीएससी’ आणि ‘सीबीएससी’ मंडळाचा अभ्यासक्रम राबविण्यात असलेल्या शाळांना पालक प्राधान्य देत आहेत. स्पर्धेत टिकायचे असेल तर ‘आयसीएससी’ आणि ‘सीबीएससी’ शिवाय पर्याय नाही ही मानसिकता बळावत चालली आहे, याचाच परिणाम म्हणून महापालिकेच्या ‘मुंबई पब्लिक स्कूल’ मध्येही प्रवेश मिळवण्यासाठी पालकवर्गात स्पर्धा सुरु झाली आहे. ८६८ जागांसाठी तब्बल चार हजार अर्ज दाखल झाल्यामुळे लॉटरी पद्धतीचा अवलंब करण्यात येणार असून फेब्रूवारी महिन्यात लॉटरी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. सध्या महापालिकेच्या मुंबईतील ११ शाळांमध्ये ‘सीबीएससी’चा अभ्यासक्रम राबविण्यात येतो. तर प्रत्येकी एका शाळेत ‘आयसीएससी’, ‘इंटरनॅशनल जनरल सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एजुकेशन’ (‘आयजीसीएसई’) आणि ‘आयबी’चा अभ्यासक्रम राबविण्यात येतो.

हे सुद्धा वाचा

BMC Schools : मुंबईतील दोन शाळांचा देशातील अव्वल दहा शाळांमध्ये समावेश, आदित्य ठाकरेंनी केले कौतुक

MSEDCL : मुंबईकरांना होणार 15% वीज दरवाढीची डोकेदुखी

रुग्णवाहिकांसाठी स्वतंत्र मार्गिका लागू करा; माजी आरोग्य मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांना सूचना

महापालिकेच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, शाळेत प्रवेश घेण्यासाठी एकूण चार हजार ११९ अर्ज महापालिकेकडे जमा झाले आहेत. ते म्हणाले, ”हे सर्व अर्ज शाळेत प्रवेश घेण्यासाठी दाखल झाले आहेत. इतर सर्व इयत्तांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. त्यामुळे या वर्षीपासून प्रवेश पातळीवरील प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.”
महापालिकेच्या सर्व ११ ‘सीबीएससी’ शाळांमध्ये आणि एका शाळेत ‘आयसीएससी’चा शाळेत शिशुवर्गाच्या दोन इयत्ता आहेत. प्रत्येक वर्गात ३४ विद्यार्थ्यांना सामावून घेण्यात येणार आहे. तर माटुंगा येथील ‘आयजीसीएसई’ अभ्यासक्रम असलेल्या आणि विलेपार्ले येथील ‘आयबी’ चा अभ्यासक्रम असलेल्या शाळेत शिशु वर्गाची एकच इयत्ता असून प्रत्येक वर्गात २६ विद्यार्थी असतील.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी