34 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
HomeमुंबईGaneshotsav 2022: बुडण्यापासून वाचा - बाप्पाचे विसर्जन स्वयंसेवकांच्या मदतीने करा

Ganeshotsav 2022: बुडण्यापासून वाचा – बाप्पाचे विसर्जन स्वयंसेवकांच्या मदतीने करा

गणेश विसर्जन (Ganpati Visarjan) दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, याकरिता विशेष काळजी घेत मुंबई महापालिका प्रशासनाने (BMC) खास खबरदारी मुंबईच्या चौपाट्यांवर घेतलेली दिसत आहे.

गणेश विसर्जन (Ganeshotsav 2022) दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, याकरिता विशेष काळजी घेत मुंबई महापालिका प्रशासनाने (BMC) खास खबरदारी मुंबईच्या चौपाट्यांवर घेतलेली दिसत आहे. आपल्या घरगुती बाप्पाचे विसर्जन करताना गणेश भक्तांनी खोल समुद्रात जाणे टाळावे. सोबत येथे उपस्थित असलेल्या स्वयंसेवकांच्या स्वाधीन आपला बाप्पा करून त्याचे विसर्जन करू शकता किंवा त्यांच्या मदतीने तुम्हाला तुमच्या लाडक्या बाप्पाचे विसर्जन ही करता येऊ शकते. त्यामुळे बाप्पाचे विसर्जन करताना बुडण्यापासूनचा धोका सहज टाळता येणार आहे. असेच सकारात्मक दृश्य सध्या मुंबईच्या चौपाट्यांवर विसर्जन दरम्यान पाहायला मिळत आहे.

रविवारी पाच दिवसांच्या गणपती विसर्जन झाले. आज सोमवारी गौरी गणपतीचे विसर्जन होत आहे. त्यामुळे आज मुंबईच्या चौपाट्यांवर गणेशभक्तांची अलोट गर्दी उसळणार आहे. अशावेळी शक्यतो मनपातर्फे उभारण्यात आलेल्या कृत्रिम तलावांमध्येच गणेशभक्तांनी गणेश मूर्ती विसर्जीत करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.

Ganeshotsav 2022: बुडण्यापासून वाचा - बाप्पाचे विसर्जन स्वयंसेवकांच्या मदतीने करा

कृत्रिम तलावांमध्ये मूर्ती विसर्जन करण्याचे प्रमाण वाढत असले तरी  गणेशभक्त स्वतः च्या घरगुती बाप्पाचे विसर्जन चौपाट्यांवर येऊन करत असल्याचे दिसत आहे. अशावेळी भक्तांनी जास्तीत जास्त आत समुद्रात जाऊन मूर्ती विसर्जीत करण्याचे टाळावे, असे आवाहन मनपाकडून केले जात असते.

तरीही काही अतिउत्साही भक्त आपल्या बाप्पाची मूर्ती डोक्यावर घेत समुद्राच्या पाण्यात उतरतात. अशावेळी बुडण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा धोका टाळण्यासाठी गणेशभक्तांनी आपल्या घरगुती बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन स्वतः न करता चौपाट्यांवर तैनात असलेल्या स्वयंसेवकातर्फे करू शकता. याकरिता कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नसून ही सेवा अनेक सामाजिक संस्थाकडून दिली जात आहे, असे मनपाने सांगितले.

 

हे सुद्धा वाचा –

Cyrus Mistry: उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू

BJP: ‘हिंदू सण हा भाजपचा आत्मा’

Ajit Pawar : अजित पवार म्हणाले, सत्ता नसली तरी कामे करणार

दरम्यान, विसर्जन स्थळी कोणी बुडत असेल तर त्याला वाचविण्यासाठी मनपाने यंदा प्रमुख विसर्जनस्थळी 786 जीवरक्षक तैनात केलेले आहेत. यातील बहुतेक जीवरक्षक हे कोळीबांधव असून ते पोहण्यात तरबेज असून त्यांची आरोग्य तपासणी करूनच त्यांची निवड करण्यात आलेली आहे. यासोबत 45 मोटार बोट चौपाट्यांवर तैनात करण्यात आलेल्या आहेत.

तसेच मनपाने 24 वार्डात 188 नियंत्रण कक्ष, चौपाट्यांवर 188 प्रथमोपचार केंद्र व 83 रुग्णवाहिका, निर्माल्यापासून खत बनविण्यासाठी निर्माल्य गोळा करण्यास उपयोगी ठरणारे 357 निर्माल्य कलश व 287 निर्माल्य वाहने तैनात केलेल्या आहेत. विसर्जनासाठी येणाऱ्या वाहनांची चाके वाळूमध्ये रुतू नयेत याकरिता 460 पोलादी प्लेटची व्यवस्था करण्यात आलेली आहे. विसर्जनकरिता मनपाने सुमारे स्वतः चे 10 हजार अधिकारी व कर्मचारी कार्यरत ठेवलेले आहेत.

गणेशभक्तांनी शांततेत आपल्या लाडक्या गणरायाचे विसर्जन करावे, विसर्जन स्थळी जास्तीत जास्त स्वच्छता राखण्याकडे भर द्यावा आणि गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन करताना स्वयंसेवकांची मदत घ्यावी, असे आवाहन मनपा उपायुक्त रमाकांत बिरादार यांनी केले आहे.

आमचा यू ट्यूब चॅनेलसुद्धा सबस्क्राईब करा –

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी