33 C
Mumbai
Tuesday, April 23, 2024
HomeमुंबईBMC: मुंबईत पाणीबाणी! ४ फेब्रुवारीपर्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा

BMC: मुंबईत पाणीबाणी! ४ फेब्रुवारीपर्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा

पाणीपुरवठा कमी दाबाने होण्याच्या कालावधी दरम्यान नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे आणि पाणी जपून व काळजीपूर्वक वापरावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.

बृहन्मुंबई महापालिकेकडून (BMC) भांडुप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्रास अतिरिक्त 4,000 मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी जोडण्याचे काम 30 जानेवारी 2023 रोजी सकाळपासून हाती घेण्यात आली. भांडुप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्रास अतिरिक्त 4,000 मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी जोडण्याचे काम महानगरपालिकेद्वारे हाती घेण्यात येणार आहे. तसेच भांडुप संकुलाशी संबंधित असलेल्या विविध जल वाहिन्यांवर अर्थात मुंबईतील 24 विभागांपैकी 12 विभागातील पाणीपुरवठा पूर्णतः बंद असेल तर 2 विभागातील पाणीपुरवठ्यात 25 टक्के कपात करण्यात येईल, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेचे जल-अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांनी दिली आहे.

मुंबईकरांना करण्यात येणारा दैनंदिन पाणीपुरवठा हा सुरळीतपणे व्हावा यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे आणि पाणीपुरवठा प्रकल्प खात्याद्वारे पाणीपुरवठा विषयक सुधारणांची तसेच परिक्षणाची विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनानुसार वेळोवेळी अशी विकास कामे हाती घेतली जातात. कामाच्या कालावधी दरम्यान नागरिकांनी केलेल्या सहकार्याबद्दल जल अभियंता खात्याद्वारे मुंबईकरांचे आभार मानण्यात आले आहेत. त्याचबरोबर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पाणी गाळून व उकळून पिण्याचे आवाहन महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे करण्यात आलं आहे.

जल अभियंता खात्याद्वारे निर्धारित करण्यात आलेली संबंधित कामे आता पूर्ण झाली असल्याने पाणीपुरवठा हळूहळू पूर्वपदावर येत असून सुरळीत होत आहे. तथापि, नवीन जलवाहिनीची जोडणी, झडपा बसविणे व उद्भवलेल्या गळतीची दुरुस्ती करणे व इतर काही तांत्रिक कामे नुकतीच करण्यात आलेली असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नागरिकांनी पिण्याचे पाणी गाळून व उकळून वापरावे असं सांगण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा : जलसंधारण खात्यातील भ्रष्टाचाराला मुख्यमंत्र्यांनी लावला चाप !

राज्यातील पाणी योजनांना आता इलेक्ट्रोक्लोरिनेशनची साथ

BMC News: महानगरपालिका मुंबई शहरातील पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी राबवणार नवीन उपक्रम

महानगरपालिकेचे जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांनी सांगितले की, दिनांक 30 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10 वाजेपासून दुसऱ्या दिवशी म्हणजेच दि. 31 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 24 विभागांपैकी काही विभागातील पाणीपुरवठा बंद होता. या अंतर्गत पश्चिम उपनगरातील के पूर्व, के पश्चिम, पी दक्षिण, पी उत्तर, आर दक्षिण, आर मध्य, आर उत्तर, एच पूर्व आणि एच पश्चिम हे 9 विभाग; तर पूर्व उपनगरातील एस विभाग, एन विभाग आणि एल हे 3 विभाग; यानुसार 12 विभागांचा यात समावेश होता. त्याचबरोबर ‘जी उत्तर’ आणि ‘जी दक्षिण’ या २ विभागातील काही परिसरांमध्ये 25 टक्के कपात लागू करण्यात आली होती. 2 ठिकाणी झडपा बसविणे, नवीन जलवाहिन्यांची जोडणी करणे आणि 2 ठिकाणी उद्भवलेली गळती दुरुस्त करणे इत्यादी कामे हाती घेतली जाणार आहेत. या कामांमुळे 30 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी, 31 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत ज्या कामांसाठी पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता, ती सर्व कामे जल अभियंता खात्याच्या चमुद्वारे दिवसरात्र पद्धतीने व युद्ध पातळीवर अव्याहतपणे करण्यात आली.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना करण्यात येणारा पाणीपुरवठा हा अधिक सुरळीतपणे व चांगल्या पद्धतीने व्हावा, यासाठी ही कामे हाती घेण्यात आली आहेत. सदर तांत्रिक व परिरक्षण विषयक कामे योग्यप्रकारे पूर्ण झाली असली, तरी देखील जल अभियांत्रिकीय दृष्टीकोनातून येत्या दिनांक 4 फेब्रुवारी 2023 पर्यंत उपरोक्त 12 विभागांमध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठा कमी दाबाने होण्याच्या कालावधी दरम्यान नागरिकांनी पाणी जपून व काळजीपूर्वक वापरावे व महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी