31 C
Mumbai
Friday, March 29, 2024
HomeमुंबईBMC News: महानगरपालिका मुंबई शहरातील पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी राबवणार नवीन उपक्रम

BMC News: महानगरपालिका मुंबई शहरातील पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी राबवणार नवीन उपक्रम

सक्शन मशिन आणि उच्च क्षमतेचे डिवॉटरिंग पंप असलेली ही नऊ वाहने 108 कोटी रुपये खर्च करून खरेदी केली जातील. ज्यामध्ये आठ वर्षांच्या कालावधीसाठी त्यांचा ऑपरेशन आणि देखभाल खर्चाचा सुद्धा समावेश आहे. त्याबाबत, बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) या महिन्याच्या सुरुवातीला निविदा जारी केल्या आणि तीन महिन्यांमध्ये ही वाहने खरेदी करण्याची शक्यता आहे.

दरवर्षी मुंबईमध्ये पावसाळयाच्या मोसमात (Monsoon period) ठिकठिकाणी पाणी साचून जलभराव झाल्यानंतर रस्ते वाहतूक विस्कळीत होण्याच्या घटना मुंबईकरासाठी काही नवीन गोष्ट नाही. परंतु या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मुंबई महानगरपालिका (BMC) एक विशेष मोहीम राबविण्याच्या तयारीत आहे. मुंबई शहरातील नऊ प्रशासकीय वॉर्डांपैकी प्रत्येक वार्डाला पावसाळ्यात साचलेल्या पाण्याचे ‍नियोजन करण्यासाठी आणि पावसाळा नसलेल्या महिन्यांमध्ये शहरातील बंदिस्त भूमिगत गटारांचे जाळे स्वच्छ करण्यासाठी आपत्कालीन पूर पुनर्प्राप्ती वाहन (Emergency Flood Recovery Vehicle)  मिळणार आहे. मुंबई शहर मुख्यत: कुलाबा ते माहीम, माटुंगा आणि वडाळा पर्यंत A वॉर्ड आणि F/North वॉर्ड या दरम्यान विस्तारलेले आहे.

सक्शन मशिन आणि उच्च क्षमतेचे डिवॉटरिंग पंप असलेली ही नऊ वाहने 108 कोटी रुपये खर्च करून खरेदी केली जातील. ज्यामध्ये आठ वर्षांच्या कालावधीसाठी त्यांचा ऑपरेशन आणि देखभाल खर्चाचा सुद्धा समावेश आहे. त्याबाबत, बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) या महिन्याच्या सुरुवातीला निविदा जारी केल्या आणि तीन महिन्यांमध्ये ही वाहने खरेदी करण्याची शक्यता आहे. ऑक्‍टोबर ते मे या कोरड्या महिन्यांमध्ये व्हॅक्यूम क्लिनरप्रमाणे नाले साफसफाईसाठी यंत्रे वापरली जातील. पावसाळ्याच्या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यास पाणी त्वरीत बाहेर काढण्यासाठी आणि आणीबाणीच्या परिस्थितीत डिवॉटरिंग पंप वापरले जातील.

मुंबईच्या उपनगरांमध्ये उघड्या पावसाळयाचा पाण्याचा निचरा होण्यासाठी नाल्यांचे विस्तृत जाळे आहे. परंतु त्या तुलनेने  मुंबईच्या दक्षिण ब्रिटिशकालीन नाल्यांचे केवळ 70 किमीचे जाळे आहे.

हे सुद्धा वाचा –

Eknath Shinde Camp: बाळासाहेब ठाकरेंचा सर्वात जवळचा व्यक्तीसुद्धा एकनाथ शिंदे गटात सामिल

Sanjay Raut : संजय राऊतांचा कारागृहातील मुक्काम वाढला! न्यायालयाने जामीन अर्जावर दिले खास निर्देश

Supreme Court : ठाकरे गटाच्या वकीलांकडून शिंदेगटाची कोंडी!

या नवीन उपक्रमाबदद्ल माहिती देताना मुंबई महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले की, उपनगरात मोठ्या प्रमाणात उघड्या नाल्यांचे जाळे असल्याने पोक्लेन मशिनरीसह साफसफाई करणे सोपे होते. परंतु मुंबई  शहरातील बंद नाले साफ करण्यासाठी प्रभावी यंत्रणा असणे आवश्यक आहे. शहर परिसरात ते काम आव्हानात्मक ठरले आहे. नाल्यामध्ये साचलेला कचरा आणि गाळ यांची साफसफाई करण्यासाठी या यंत्रामध्ये उच्च क्षमतेचे सक्शन पंप आहेत. नऊ वाहनांच्या पहिल्या तुकडीनंतर महानगरपालिका पुढील काही वर्षांमध्ये उपनगरातील ज्या भागात बंद नाले आहेत त्यांच्यासाठी आणखी वाहने खरेदी करणार आहे.

दक्षिण मुंबईतील ब्रिटीशकालीन नाल्यांच्या सफाईसाठी BMC ने प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्याची ही पहिलीच वेळ नाही. साल 2019 मध्येही मुंबई महानगरपालिकेने मुंबईच्या शहरातील बंद नाले साफ करण्यासाठी तीन रोबोटिक मशिन्स भाड्याने घेतल्या परंतु त्यांनी अपेक्षित परिणाम दिला नाही आणि वर्षभरात त्या वापराविना पडल्या होत्या.

अश्विन शेश्वरे
अश्विन शेश्वरेhttp://laybhari.in
He writes about National and Maharashtra Politics, Education, Health, Civic, Legal, Crime and Sports beat for LayBhari News.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी