29 C
Mumbai
Monday, September 11, 2023
घरमुंबईHigh Court News : अपघातात अपंगत्व आलेल्या व्यक्तींसाठी मुंबई उच्च न्यायालयाने घेतला...

High Court News : अपघातात अपंगत्व आलेल्या व्यक्तींसाठी मुंबई उच्च न्यायालयाने घेतला महत्वाचा निर्णय

मुंबईमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये रस्ते अपघातातील संख्येमध्ये वाढ झाली आहे. रस्ते अपघातात अनेक लोकांना कायमचं अपंगत्व देखील आलेले आहे. याचसाठी मुंबई उच्च न्यायालयाकडून रस्ते अपघातातील पीडितांसाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये रस्ते अपघातातील संख्येमध्ये वाढ झाली आहे. रस्ते अपघातात अनेक लोकांना कायमचं अपंगत्व देखील आलेले आहे. तसेच यामुळे त्यांना त्यांच्या जीवनात अनेक वाईट प्रसंगांना देखील सामोरे जावे लागते. याचसाठी मुंबई उच्च न्यायालयाकडून (Bombay High Court) रस्ते अपघातातील पीडितांसाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. रस्ते अपघातात कायमचं अपंगत्व आलेल्या लोकांना नुकसान भरपाई म्हणून अधिक मोबदला देण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने घेतला आहे. रस्ते अपघातातील पीडित व्यक्तीचा विचार करता त्यांच्या नुकसान भरपाईत वाढ होणे गरजेचे आहे असे उच्च न्यायालयाकडून नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आता यापुढे रस्ते अपघातात कायमचं अपंगत्व आलेल्या व्यक्तींना मुंबईत उच्च न्यायालयाने एक कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईतील एका रस्ते अपघातात कायमच अपंगत्व आलेल्या एका सामान्य नागरिकाच्या याचिकेमुळे मुंबई उच्च न्यायालयाकडून हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील याचिकाकर्ते योगेश पांचाळ यांना 29 नोव्हेंबर 2004 रोजी एका रस्ते अपघातात कायमच अपंगत्व आले. मुलुंडमधील सोनापूर येथून जात असताना त्यांना एका डंपरने धडक दिली.

या अपघातानंतर योगेश पांचाळ यांच्यावर अनेक उपचार करण्यात आले. परंतु तरी देखील योगेश पांचाळ हे कायमचे अपंग झाले. यानंतर योगेश पांचाळ यांनी नुकसान भरपाईसाठी मोटार वाहन अपघात विभागाकडे याबाबत अर्ज केला. त्यानंतर नुकसान भरपाई म्हणून मोटार वाहन अपघात विभागाने 48 लाख रुपयांची नुकसान भरपाई ही 7.5 टक्के व्याजाने देण्याचा आदेश दिला.

दरम्यान, योगेश पांचाळ हे धातू कापणीचे काम करून घर चालवत असल्याने त्यांनी या निर्णयावर असमाधान व्यक्त केले. या सर्व घटनेनंतर योगेश पांचाळ यांनी मुंबई उच्च न्यायालयात भरपाईची रक्कम वाढवून देण्याची मागणी असणारी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती अनुजा प्रभादेसाई यांनी महत्वपूर्ण निर्णय दिला आहे.

हे सुद्धा वाचा

Digital Media : डिजिटल मीडिया संपादक, पत्रकार संघटनेचे शनिवारी राज्यस्तरीय अधिवेशन; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन

Lay Bhari Diwali Magzine : ‘लय भारी’चा दिवाळी अंक राजकारण्यांसाठी ‘अभ्यास पुस्तक’, मुख्यमंत्र्यांनी दिवाळी अंकाचे केले प्रकाशन

Crime : मंत्री दादा भुसेंचा डॅशिंग अवतार; बंगल्यात घुसून दरोडेखोराला पकडले

न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांनी योगेश पांचाळ यांची बाजू ऐकून घेत या अपघातानंतर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर या घटनेमुळे खूप मोठा परिणाम झाल्याचे म्हंटले आहे. योगेश पांचाळ यांना या अपघातानंतर कमरेपासून पायापर्यंत कायमचे व्यंगत्व आले आहे. ज्यामुळे त्यांच्या वैवाहिक, कौटुंबिक आयुष्यावर याचा मोठा परिणाम तर झालाच आहे परंतु, यामुळे त्यांना मोठा मानसिक त्रास देखील सहन करावा लागल्याचे न्यायमूर्तींकडून नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आता मुंबई उच्च न्यायालयाने नुकसान भरपाईच्या रकमेत अतिरिक्त 64 लाख 86 हजार 715 रुपयांची वाढ केली आहे. तसेच यापुढे रस्ते अपघातात कायमचं अपंगत्व आलेल्या पीडितांना एक कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याचा महत्वपूर्ण निर्णय देखील दिला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी