30 C
Mumbai
Friday, September 2, 2022
घरमुंबईBreaking : राष्ट्रवादी नेते अनिल देशमुख रुग्णालयात दाखल, 'चक्कर'चे झाले निमित्त

Breaking : राष्ट्रवादी नेते अनिल देशमुख रुग्णालयात दाखल, ‘चक्कर’चे झाले निमित्त

अनिल देशमुख यांना नेमका कोणता त्रास होत आहे याबाबत अद्याप कोणतीच माहिती उपलब्ध नाही परंतु अनेक दिवस छातीत दुखत असल्याची तक्रार करून सुद्धा इतके दिवस याकडे का दुर्लक्ष करण्यात आले असा सवाल या निमित्ताने समोर येऊ लागला आहे.

ईडीच्या कचाट्यात सापडलेले राष्ट्रवादी काॅंग्रेस नेते अनिल देशमुख सध्या तुरुंगवास भोगत आहेत, दरम्यान आज यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. अनिल देशमुख तुरुंगात चक्कर येऊन पडल्याने त्यांना मुंबईतील जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी त्यांचा रक्तदाब वाढल्याचे सांगण्यात येत असून अनेक दिवसांपासून त्यांच्या छातीत दुखत असल्याचे सुद्धा समोर आले आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मनी लाॅंन्डरींग केल्याप्रकरणी ईडीने त्यांच्या अनेक मालमत्तेवर छापे मारून असून याप्रकरणात त्यांना अटक करण्यात आली. महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांमध्ये देशमुख यांची गणना होत असली तरीही कारवाईमुळे सध्या देशमुखांचे राजकीय कामकाजाला फुलस्टाॅप लागल्याचे दिसत आहे.

आज सकाळी 11 च्या सुमारास अनिल देशमुख यांना तुरुंगात चक्कर आले आणि ते जागीच कोसळले. देशमुख यांना चक्कर आल्याचे कळताच तुरुंगातील कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू झाली. डाॅक्टरांना बोलावून अनिल देशमुख यांना तपासण्यात आले. तपासणीवेळी देशमुखांचे रक्तदाब वाढल्याचे निदर्शनास आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत काही वेळात जे जे रुग्णालयात देशमुख यांना दाखल करण्याता निर्णय घेण्यात आला. आणखी पुढचे दोन – तीन दिवस अनिल देशमुख यांना डाॅक्टरांच्या देखरेखेखाली रुग्णालयातच ठेवण्यात येणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

 हे सुद्धा वाचा…

International ‘Dog’ Day : इंटरनॅशनल ‘डॉग’ डे म्हणजे कुत्र्यांच्या प्रामाण‍िक पणाचा गौरव

Kishori Pednekar : ‘मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेच जिंकणार’

Shiv Sena : शिवसेनेला मिळाली संभाजी ब्रिगेडची साथ

कायम रुबाबात वावरणारे अनिल देशमुख यांची शारीरिक स्थिती ढासळली आहे, ते पुरते खंगल्याचे दिसून येत असल्याने अनेकांना धक्का बसत आहे. पैशाचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याने राष्ट्रवादीतील एक खंदा नेता बाजूला सारला गेल्यासारखे अनेकांना वाटत आहे. भाजपमधील किरीट सोमय्या यांनी आवाज उठवत अनिल देशमुखांच्या आर्थिक गैरव्यवहाराची बाब निदर्शनास आणली होती, त्यानंतर नवाब मलिक आणि संजय राऊत यांचा सुद्धा लागोपाठ नंबर लागला आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली.

दरम्यान अनिल देशमुख यांना नेमका कोणता त्रास होत आहे याबाबत अद्याप कोणतीच माहिती उपलब्ध नाही परंतु अनेक दिवस छातीत दुखत असल्याची तक्रार करून सुद्धा इतके दिवस याकडे का दुर्लक्ष करण्यात आले असा सवाल या निमित्ताने समोर येऊ लागला आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी