33 C
Mumbai
Friday, September 2, 2022
घरमुंबईMumbai Building Collapsed : काही क्षणातच इमारत पत्त्यांसारखी कोसळली; बोरिवलीमध्ये घडली दुर्घटना

Mumbai Building Collapsed : काही क्षणातच इमारत पत्त्यांसारखी कोसळली; बोरिवलीमध्ये घडली दुर्घटना

मुंबईतील बोरिवलीमध्ये मात्र इमारत कोसळल्याची (building collapsed) मोठी दुर्घटना आज (ता. १९ ऑगस्ट) घडली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या दुर्घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

राज्यात एकीकडे दहीहंडी सणाचा उत्साह ओसंडून वाहत आहे. तब्बल दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त दहीहंडी साजरी करण्यात येत असल्याने गोविंदांमध्ये आनंदी आनंद पाहायला मिळत आहे. पण मुंबईतील बोरिवलीमध्ये मात्र इमारत कोसळल्याची (building collapsed) मोठी दुर्घटना आज (ता. १९ ऑगस्ट) घडली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या दुर्घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये हि इमारत काही क्षणातच पत्त्यांसारखी कोसळत असल्याचे दिसून येतेय. बोरिवली पश्चिमेकडील साईबाबा नगर येथे ही दुर्घटना घडली असून गीतांजली असे या चार मजली इमारतीचे नाव आहे. दुर्घटना होण्याच्या काही तास आधीच ही इमारत पूर्णतः रिकामी करण्यात आली होती, अशी माहिती समोर आली आहे.

बोरिवली पश्चिम येथे असलेल्या साईबाबा नगर या भागात गीतांजली नावाची चार मजली इमारत होती. सदर इमारत ही धोकादायक असल्याची नोटीस या इमारतीतील स्थानिकांना महानगरपालिकेच्या आर विभागाकडून देण्यात आली होती. पण याविरोधात या इमारतीत राहणारे नागरिक हे कोर्टात गेले होते. परंतु आज (ता. १९ ऑगस्ट) सकाळी गीतांजली इमारतीत राहणाऱ्या रहिवाश्यांकडून ही इमारत खाली करण्यात आली होती.

हे सुद्धा वाचा

Defense Journalism Course : होय! संरक्षण पत्रकारितेचा लवकरच कोर्स सुरू

Raju Srivastav : सुप्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीत सुधारणा नाहीच

Dahi Handi 2022 : शासकीय रुग्णालयामध्ये जखमी गोविंदांवर होणार मोफत उपचार

नशीब बलवत्तर म्हणून की काय पण ऐन वेळी इमारत रिकामी करण्यात आल्याने या ठिकाणी घडणारी मोठी दुर्घटना टळली. इमारत रिकामी केल्यानंतर काही तासातच म्हणजेच दुपारी १२.३० वाजताच्या दरम्यान ही इमारत लोकांच्या नजरेसमोर पत्त्यासारखी कोसळली. ही दुर्घटना घडताच घटनेच्या ठिकाणी अग्निशमन पथक तत्काळ दाखल झाले. दरम्यान, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे मुंबई पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेनंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तसेच त्यांनी तात्काळ बचावकार्य देखील सुरु केल्याची माहिती देण्यात आली.

सदर दुर्घटना घडल्यानंतर या इमारतीच्या मलब्याखाली इमारतीतील नागरिक अडकले असण्याची सुरुवातीस शक्यता वर्तवण्यात आली होती. पण असे काहीही नसल्याचे मुंबई महापालिकेच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी