22 C
Mumbai
Friday, January 27, 2023
घरमुंबईAditya Thackeray : मुंबईत चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या कोणाच्या आदेशाने? आदित्य...

Aditya Thackeray : मुंबईत चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या कोणाच्या आदेशाने? आदित्य ठाकरेंचा सवाल

मुंबईत चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या 90 दिवसांत 6 बदल्या झाल्या, काहींच्या तर 24 तासांत बदल्या केल्या, प्रशासनात असा गोंधळ का होतोय?, कोणाच्या आदेशाने हे सगळं होत आहे? मुंबईत गेल्या तीन महिन्यांत किती प्रोजेक्ट आले किती बंद झाले, असा सवाल करतानाच माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी विरोधकांना केला.

मुंबईत चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या 90 दिवसांत 6 बदल्या झाल्या, काहींच्या तर 24 तासांत बदल्या केल्या, प्रशासनात असा गोंधळ का होतोय?, कोणाच्या आदेशाने हे सगळं होत आहे? मुंबईत गेल्या तीन महिन्यांत किती प्रोजेक्ट आले किती बंद झाले, असा सवाल करतानाच माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी विरोधकांना केला. यावेळी ते म्हणाले मुंबई ही आमच्यासाठी कर्मभूमी आहे. आदित्य ठाकरे मुंबईत एका पत्रकार परिषदेत बोलत होते.

मुंबईतील रस्त्यांसाठी 5 कोटी रुपये देणार तसेच रस्त्ये खड्डेमुक्त होतील, असे मुख्यमंत्री म्हणाले होते. मात्र आता टेंडर स्क्रॅप केले आहेत. 1 ऑक्टोबर ते 1 जून या काळात रस्त्यांची कामे केली जातात मात्र आता ऑक्टोबर महिना निघून गेला आहे, आता टेंडर कधी निघणार याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे असे आदित्य ठाकरे म्हणाले. येत्या पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांवर खड्डे पडल्यास मुख्यमंत्री जबाबदार राहतील, असे देखील आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

सरकारने मुंबईच्या सौंदर्यीकरणासाठी 1700 कोटी रूपये वळविले मात्र नेमके काय करायचे याबाबत धोरण नाही, गाईडलाईन्स नाहीत. त्यामुळे 1700 कोटी रुपयांचा घोळ झाल्याचा आरोप देखील आदित्य ठाकरे यांनी केला. खोके सरकामुळे राज्यातील 5 मोठे उद्योग राज्याबाहेर गेल्याचा आरोप करतानाच ते म्हणाले राज्यात अद्याप ओला दुष्काळ जाहीर करण्यात आला नाही. शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नसल्याचे आदित्य ठाकरे या पत्रकार परिषदेत म्हणाले. मुंबईत डीसलीनेशन प्रोजेक्ट, सायकल ट्रॅक प्रोजेक्ट प्रोजेक्टचे नेमका काय झालं कोणालाच माहीत नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
हे सुद्धा वाचा :
Raju Shetti : एक रकमी एफआरपीसाठी स्वाभिमानीचे ऊस तोड बंद आंदोलन

Raju Shetti : एक रकमी एफआरपीसाठी स्वाभिमानीचे ऊस तोड बंद आंदोलन

मुंबईतील कामे वेळेत पूर्ण करा; पालिका अधिकाऱ्यांना पालकंत्री केसरकरांच्या सूचना

यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार टीका देखील केली. मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी तूमच्यासाठी असे आमच्यासाठी मात्र मुंबई कर्मभूमी असल्याचे ते यावेळी म्हणाले, मुंबईच्या सौंदर्यीकरणासाठी 1700 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. मात्र त्यासाठी काही गाईडलाईन्स आहेत का, याबाबत कोणालाच काही माहिती नाही त्यामुळे 1700 कोटी रूपयांचा घोळ झाल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. तसेच मुंबईतील रस्त्यांच्या खड्ड्यांवरून देखील त्यांनी मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले. रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपये देणार असे मुख्यमंत्री म्हणाले होते. मात्र रस्त्यांची कामे अद्याप सुरू झाली नाहीत असे देखील ते यावेळी म्हणाले.

 

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!