28 C
Mumbai
Wednesday, August 3, 2022
घरमुंबईसोबत शस्त्र बाळगताय....? हे जरुर वाचायलाच हवे

सोबत शस्त्र बाळगताय….? हे जरुर वाचायलाच हवे

टीम लय भारी

ठाणे : शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ठाणे पोलिस आयुक्तालयाकडून शस्त्र वापरासंबंधी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे शहर विशेष शाखेचे पोलिस उप आयुक्त डाॅ. सुधाकर पठारे यांनी 23 जुलै 2022 पर्यंत शहरात कुणालाही शस्त्र बाळगता येणार नाही किंवा शस्त्र घेऊन कुठेही जाता येणार नाही असे मनाईचे आदेश लागू केले आहेत.

या कालावधीत जाहीरसभा घेणे, मिरवणुका काढणे, घोषणा – प्रतिघोषणा देण्यास सुद्धा मनाई करण्यात आली आहे तसेच पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. दरम्यान या आदेशाचा भंग झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. 23 जुलै 2022 पर्यंत हा मनाई आदेश लागू करण्यात आले असून आदेशात नमूद करण्यात आले आहे.

मनाई आदेशाच्या या कालावधीत शस्त्रे, सोटे, बंदुका, लाठ्या किंवा शरीरास इजा करण्यासाठी वापरण्यात येईल अशी कोणतीही वस्तु सोबत बाळगणे, वाहून नेणे, जमा करणे व तयार करण्यास बंदी घालण्यात आली आहे. दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करण्यास मनाई करण्यास आली आहे. कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ, द्रव बाळगणे, बरोबर नेण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

दरम्यान, पोलिस आयुक्त व त्यांनी प्रदान केलेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या सभा, मिरवणुका, सर्व शासकीय – निमशासकीय कर्मचारी हे कर्तव्य पार पाडत असलेले ठिकाण आदींना हे आदेश लागू राहणार नाहीत असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा…

मुंबईकरांनो समुद्र किनारी जाणे टाळा; महापालिका प्रशासनाच्या मुंबईकरांना सूचना

एसी लोकलचा प्रवाशांना दणका; स्टेशन आले तरी दरवाजे उघडलेच नाहीत

दहशतवादांच्या निशाण्यावर RSS कार्यालय?

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!