29 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeमुंबईरेल्वेप्रशासन साईनगर शिर्डी ते ढेहर का बालाजी दरम्यान २० उन्हाळी विशेष गाड्या...

रेल्वेप्रशासन साईनगर शिर्डी ते ढेहर का बालाजी दरम्यान २० उन्हाळी विशेष गाड्या चालविणार

टीम लय भारी

मुंबई : लॉकडाउनच्या काळात बंद करण्यात आलेल्या रेल्वे गाड्या हळूहळू सुरू करण्यात येत आहेत. त्याबरोबर लहान मुलांना शाळेय सुट्या जाहिर झाल्या असून उन्हाळी हंगामात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वेपप्रशासनाने (Central Railway) साईनगर शिर्डी ते ढेहर का बालाजी दरम्यान २० साप्ताहिक उन्हाळी विशेष गाड्या चालवणार असल्याचा निर्णय घेतला आहे.(Central Railway Administration summer trains)

रेल्वे गाड्य़ाविषयी तपशील माहिती खालीलप्रमाणे 

गाडी क्रमांक 09740 साप्ताहिक अतिजलद उन्हाळी विशेष दि. २४.४.२०२२ ते २६.६.२०२२ पर्यंत दर रविवारी (Central Railway) साईनगर शिर्डी येथून ०७.२५ वाजता सुटेल आणि ढेहर का बालाजी येथे दुसर्‍या दिवशी ०८.१० वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक 09739 साप्ताहिक

अतिजलद उन्हाळी (Central Railway) विशेष दि. २२.४.२०२२ ते २४.६.२०२२ पर्यंत दर शुक्रवारी ढेहर का बालाजी येथून २१.२० वाजता सुटेल आणि साईनगर शिर्डी येथे दुसऱ्या दिवशी २०.३० वाजता पोहोचेल.
रेल्वे कोणत्या स्थानकांवर थांबणार: कोपरगाव, मनमाड, भुसावळ, हरदा, इटारसी, भोपाळ, शुजालपूर, उज्जैन, नागदा, रामगंज मंडी, कोटा, सवाई माधोपूर, दुर्गापुरा आणि जयपूर.

संरचना: दोन द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान आणि ४ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ सामान्य द्वितीय श्रेणीसह ब्रेक व्हॅन
आरक्षण: पूर्णत: आरक्षित विशेष ट्रेन क्रमांक 09740 साठी विशेष शुल्कासह बुकिंग दि. २०.४.२०२२ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल. तपशीलवार वेळा आणि थांब्यांसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला (Central Railway) भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.

हे सुद्धा वाचा :- 

Now, railway ticket booking at 45K post offices

भोंग्यावर दुटप्पी धोरणापेक्षा देशभरासाठी एक राष्ट्रीय धोरण निश्चित करा : संजय राऊत

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी