29 C
Mumbai
Friday, March 17, 2023
घरमुंबईमुंबईतील एलाईट महाविद्यालयाचा शेतकऱ्यांसाठी कौतुकास्पद उपक्रम, चंद्रकांत पाटलांनी केले कौतुक

मुंबईतील एलाईट महाविद्यालयाचा शेतकऱ्यांसाठी कौतुकास्पद उपक्रम, चंद्रकांत पाटलांनी केले कौतुक

बदलती जीवनशैली व योग्य आहाराच्या अभावामुळे आजाराचे वाढते प्रमाण ही एक समस्या बनत चालली आहे. ग्लुकोजसारखे घटक शरीरात कमी प्रमाणात असणे. हे वेगवेगळ्या आजारांस कारणीभूत ठरत असल्याचे प्रमुख कारण आहे. तज्ज्ञांच्या मते भरड धान्य (Millet) हे पोषण तत्त्वाचे आहार आहे. याचा आहारात समावेश केल्यास प्रतिकारशक्तीच्या वाढीसाठी फायदा होतो. भरडधान्याचे महत्त्व ओळखून संयुक्त राष्ट्रसमितीने 2023 हे वर्ष भरडधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. याच पार्श्‍वभूमीवर मुंबईतील रामनारायण रुईया महाविद्यालयामध्ये (Ramnarain Ruia College) दोन दिवसांच्या आतंरराष्ट्रीय भरडधान्य परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. (Chandrakant Patil praised Ruia College students for its admirable initiative for farmers)

भरडधान्य हे अन्नाचा एक महत्वाचा स्त्रोत असून खाद्यपदार्थ म्हणून त्याची निवड करणे काळाची गरज आहे. भरडधान्यांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी ही आंतरराष्ट्रीय परिषद हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. त्यासाठी भरडधान्य उत्पादनाला प्रोत्साहन देऊन त्याचे ब्रँडिंग करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील (Chandrakant Patil) यांनी कार्यक्रमादरम्यान केले.

भरडधान्याच्या योगदानाचे महत्व, आणि पोषक आरोग्यदायी आहार म्हणून त्याची उपयुक्तता याबद्दल जनजागृती करण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून रुईया महाविद्यालयात दोन दिवसाची आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी अधिकृत ट्विटर हॅंडलवर ट्विट करत चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली आहे.

याप्रसंगी मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत, सन 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून जाहीर करण्यात आले आहे. या प्रस्तावाला जगभरातील अनेक देशांनी पाठिंबा दिला आहे. या परिषदेमुळे आरोग्यदायी आहारामध्ये भरडधान्यचे महत्व आणि उपयुक्तता याबाबत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना माहिती आणि या क्षेत्रात संशोधन करण्यास प्रोत्साहन मिळेल, असेही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा : मोदींच्या काळात आर्थिक विषमतेत वाढ

चंद्रकांत दादा म्हणतात, एकही देव ‘बॅचलर’ नाही; मारुतीराया सविस्तर चर्चेसाठी भेट घेणार!

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, तुम्ही दिल्लीत जा; नाहीतर मसणात जा

या उद्घाटन प्रसंगी रामनारायण रुईया महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ.अनुश्री लोकूर, पद्मश्री खादर वल्ली, व्यवस्थापकीय परिषदेचे अध्यक्ष एस.पी. मंडळी, अ‍ॅड. एस. के. जैन, श्रीकृष्ण चितळे, महाविद्यालय विकास समिती अध्यक्ष अ‍ॅड.मिहीर प्रभुदेसाई, प्रा. कामिनी दोंदे,उपप्राचार्य डॉ.वर्षा शुक्ला आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी