34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
HomeमुंबईChandrashekhar Bawankule : भाजपचे प्रदेशाध्यक्ष‍ चंद्रशेखर बावनकुळे 30 ऑगस्टला मुंबईत कार्यकर्त्यांना...

Chandrashekhar Bawankule : भाजपचे प्रदेशाध्यक्ष‍ चंद्रशेखर बावनकुळे 30 ऑगस्टला मुंबईत कार्यकर्त्यांना भेटणार

मंगळवारी 30 ऑगस्टला दुपारी 1 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत पक्षाच्या मुंबईतीलनरिमन पॉईंट येथील प्रदेश कार्यालयात कार्यकर्ते पदाधिकारी आणि सामान्य जनतेला भेटणार आहेत. ज्यांना प्रदेशाध्यक्षांना भेटायचे आहे. त्यांनी दुपारी 1 ते संध्याकाळी 6 वेळेत भेटायला यावे, आपली निवेदने, पत्रे द्यावी.

महाराष्ट्राच्या राजकारणाला न भूतो न भविष्यती असे वळण लागले आहे. त्यामुळे आगामी निवडणूका विराचारात घेऊन प्रत्येक पक्षाने तयारी सुरु केली आहे. भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे ही चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule)  यांच्याकडे आली आहेत. त्यांनी आता संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढायचे ठरवले आहे. दोन दिवसांपूर्वी ते बीडमध्ये होते. तर 30 ऑगस्टला गणेशोत्सवाच्या पुर्वसंध्येला ते मुंबईत आहेत. यावेळी ते मुंबईतील कार्यकर्त्यांना भेटणार आहेत. यावेळी मुंबई महानगरपालिका निवडणुकांची रणन‍िती आखली जाणार आहे. मंगळवारी 30 ऑगस्टला दुपारी 1 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत पक्षाच्या मुंबईतीलनरिमन पॉईंट येथील प्रदेश कार्यालयात कार्यकर्ते पदाधिकारी आणि सामान्य जनतेला भेटणार आहेत. ज्यांना प्रदेशाध्यक्षांना भेटायचे आहे. त्यांनी दुपारी 1 ते संध्याकाळी 6 वेळेत भेटायला यावे, आपली निवेदने, पत्रे द्यावी.

आपली समस्या तोंडी न सांगता कागदावरच लिहून द्यावी असे पक्षाकडून सांगण्यात आले आहे. तसेच येतांना कोणी पुष्पगुच्छ, हार, शाल,श्रीफळ आणू नये. सत्कार करु नये. केवळ जनतेशी संवाद साधता यावा तसेच पदाधिकाऱ्यांशी चर्चा करता यावी यासाठी ते मुंबईत येणार आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांनी बीडमध्ये जाऊन पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडेची देखील भेट घेतली होती. यावेळी पंकजा मुंडे नाराज नसून, त्या पक्षासाठी संपूर्ण दिवस काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्या कधीही नाराज नव्हत्या या गोष्टीचा खुलासा केला असुन, भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मनातल्या शंका दूर करण्याचा प्रयत्न केला.

हे सुद्धा वाचा

राणीची बाग : 200 वर्षे जुने वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान गणेश चतुर्थीला खुले राहणार

उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या दसरा मेळाव्याच्या विधानाने उद्धव ठाकरेंची डोकेदुखी आणखी वाढणार?

जाणून घ्या ! कसे आहे आज सुरु होणाऱ्या ‘आशिया चषक 2022­­­­’ चे स्वरूप

विधीमंडळाचे पावसाळी अध‍िवेशन संपले त्यानंतर लगेचच शिवसेनेने संभाजी ब्रिगेड सोबत युतीची घोषणा केली. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांनी घेतलेल्या संयुक्त परिषदेमध्ये ही घोषणा करण्यात आली. या घटनेवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी खरपूस समाचार घेतला.

दरम्यान, या घडामोडीवर चंद्रशेखर बावन कुळेंनी प्रतिक्रीया दिली आहे. संभाजी
ब्रिगेडने 2019 मध्ये 40 जागांवर निवडणूक लढवली. त्यानंतर त्यांना 0.06 टक्के मतं मिळाली. उद्धव ठाकरेंना इतकी कमी मतं असलेल्या पक्षा सोबत युती करावी लागते आहे. महाराष्ट्रातील कोणताही पक्ष त्यांच्याशी युती करायला तयार नाही. संभाजी ब्रिगेडसोबत जाऊन काहीही होणार नाही. हा काळ त्यांच्यासाठी अत्यंत वाईट आहे’ अशा शब्दात चंद्रशेखर बावकुळे यांनी टीका केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी