31 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeमुंबईप्राध्यापक नरकेंनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजकारण सोडणार ?

प्राध्यापक नरकेंनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजकारण सोडणार ?

टीम लय भारी

मुंबई : प्राध्यापक हरी नरके (Professor Hari Narke) हे त्यांच्या ट्विटरच्या माध्यमातून कायमच नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांवर तोफ डागत असतात. पुन्हा एकदा हरी नरके यांनी एका माहितीच्या आधारे भविष्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) हे राजकारण सोडणार तर… असे ट्विट केले आहे. त्यामुळे प्राध्यापक हरी नरके यांचे हे भाकीत खरे होणार आहे का ? असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.

प्राध्यापक हरी नरके यांचे एक मित्र निवडणुकीचा सर्वे करतात. त्यांनी आतापर्यंत केलेल्या निवडणुकांच्या सर्वेचे ९५ % अंदाज खरे ठरले आहेत. प्राध्यापक हरी नरकेंच्या या मित्राने नुकतेच एकनाथ शिंदे यांच्या ४० आमदारांच्या मतदारसंघात सर्वे केला. या नमुना सर्वेनुसार, भविष्यात निवडणुका झाल्यावर ४० पैकी ३७ आमदार हे त्यांच्या मतदारसंघात पराभूत होतील. ‘म्हणजे cm शिंदेसाहेब राजकारण सोडणार तर.’ असा टोला प्राध्यापक नरके यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

शिवसेना पक्षासोबत बंडखोरी करून जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदी बसले तेव्हा त्यांनी भविष्यात भाजप आणि शिंदे सरकार मिळून २०० आमदार निवडून आणणार असे म्हंटले आहे. तसेच जे आमदार त्यांच्यासोबत आहेत, भविष्यात त्यांनाच उमेदवारी देऊन ते निवडून येतील, आणि हेच आमदार पुन्हा निवडून नाही आले तर, ते राजकरण सोडतील असे वक्तव्य त्यांनी केले होते.

त्यामुळेच जर भविष्यात शिंदेंचे हे आमदार पराभूत झाले तर एकनाथ शिंदे राजकारण सोडणार का ? ते आपल्या शब्दांवर ठाम राहणार का ? हे पाहणे नक्कीच औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, प्राध्यापक हरी नरके यांच्या मित्राने केलेला हा नमुना सर्वेचा अंदाज खरा ठरणार आहे का ? हे तर निवडणुका लागल्यावर कळेल.

हे सुद्धा वाचा :

शिंदे गटाचे भविष्य आज ठरणार? खंडपीठाची आज महत्त्वपूर्ण सुनावणी

राजकारण पेटलं! शिंदे गटातील ‘या’ तीन नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

खासदार राहुल शेवाळेंवर आरोप करणाऱ्या महिलेचे मुख्यमंत्र्यांना पत्र

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी