22 C
Mumbai
Saturday, December 10, 2022
घरमुंबईCM Eknath Shinde : सर्वसामान्यांना मुख्यमंत्र्यांचे दिवाळी गिफ्ट; नवी मुंबईत सिडकोची 7849...

CM Eknath Shinde : सर्वसामान्यांना मुख्यमंत्र्यांचे दिवाळी गिफ्ट; नवी मुंबईत सिडकोची 7849 घरांची सोडत

मुंबईत स्वत:चे घर असावे अशी अनेकांची इच्छा असते, मात्र गगनाला भिडलेल्या किमतींमुळे घर हे स्वप्नच राहते, ऐन दिवाळीमध्ये आता हे स्वप्न साकार होणार आहे. दिवाळीनिमित्त सिडकोकडून नवी मुंबईत 7849 घरांची लॉटरी जाहीर करण्यात आली आहे.

मुंबईत स्वत:चे घर असावे अशी अनेकांची इच्छा असते, मात्र गगनाला भिडलेल्या किमतींमुळे घर हे स्वप्नच राहते, ऐन दिवाळीमध्ये आता हे स्वप्न साकार होणार आहे. दिवाळीनिमित्त सिडकोकडून नवी मुंबईत 7849 घरांची लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे. नवी मुंबईतील प्रस्तावित अंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात नागरिकांना स्व:ताचे घर घेता येणार आहे. उलवे नोडमधील बामणडोंगरी, खारकोपर पूर्व 2 ए, खारकोपर पूर्व 2 बी आणि खारकोपर पूर्व पी 3 येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांसाठी ही लॉटरी सोडत असणार आहे.

या योजनेच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीस 25 ऑक्टोबर 2022 पासून सुरुवात होणार आहे. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सिडकोने 7,849 सदनिकांची महागृहनिर्माण योजना आणली आहे. सिडकोची ही लॉटरी ऑनलाइन पद्धतीने पार पडणार आहेत. योजनेच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीस 25 ऑक्टोबर 2022 पासून सुरुवात होणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेचाही लाभ घेता येईल. या लॉटरीची सोडत 19 जानेवारी 2023 रोजी पार पडणार आहे. ऑनलाइन अर्ज आणि अधिक माहिती करीता https://lottery.cidcoindia.com हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.

— काय म्हणाले मुख्यमंत्री
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका व्हिडीओव्दारे सिडकोच्या घरांची घोषणा केली. दिवाळीच्या मुहुर्तावर सिडको नवी मुंबईतील उलवे नोडमधील बामनडोंगरी आणि खारकोपर येथे परवडणाऱ्या दरात 7849 सदनिका उपलब्ध करुन देत आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत या सदनिका विक्रीकरिता उपलब्ध करुन दिल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

Prithviraj Chavan : भाजप-शिंदे सरकारचा राज्याला फायदा नाही; माजी मुख्यमंत्र्यांची टीका

Aastha Sidana : बॉलिवूड अभिनेत्री आस्था सिदानाला ऑनलाईन गंडा; तब्बल इतक्या लाखांची फसवणूक

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात कोणत्याही वेळी फटाके वाजणार? शिंदे गटाचे आमदार नाराज?

ही महागृहनिर्मान योजना परिवहन केंद्रित विकास संकल्पनेवर आधारीत आहे. या योजनेव्दारे वेगाने विकसित होणाऱ्या आणि परिवहन दृष्ट्या समृद्ध असणाऱ्या उलवे नोडमध्ये हक्काचे घर घेण्याची सुवर्णसंधी नागरिकांना उपलब्ध झाली आहे. आपल्या गृहनिर्माण योजनांव्दारे विविध आर्थिक स्तरामधील नागरिकांना परवडणाऱ्या दरांत घर उपलब्ध करुन देण्यास सिडको महामंडळ संपूर्ण देशात अग्रेसर आहे. या योजनेच्या माध्यमातून देखील हजारो नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. या सुवर्णसंधीचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओव्दारे केले.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!