32 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeमुंबईवांद्रे शासकीय वसाहतीतील रहिवाशांनी 'या' कारणासाठी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट

वांद्रे शासकीय वसाहतीतील रहिवाशांनी ‘या’ कारणासाठी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट

टीम लय भारी

मुंबई : वांद्रे येथील शासकीय वसाहतीतील नागरिकांनी काल (दि. 02 जुलै) उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात शासकीय वसाहतीच्या पुनर्विकासाच्या प्रस्तावाला तत्वतः मंजूरी दिल्याबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी नागरिकांनी थेट ठाकरे यांचे निवासस्थान गाठले.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी असताना रखडलेल्या कामांना मंजूरी देत अनेक कामे मार्गी लावली आहेत. त्यामध्ये त्यांनी वांद्रे येथील शासकीय वसाहतीचा प्रश्न सुद्धा सोडवला आहे, त्यामुळे तेथील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसत आहे.

दरम्यान, शिवसेनेने याबाबत सोशल मिडीयावर पोस्ट करून उद्धव ठाकरे यांचे आभार व्यक्त करण्यासाठी मोठ्या संख्येने जमलेल्या वसाहतीतील रहिवाशांचे फोटो सुद्धा अपलोड केले आहेत.

पोस्टमध्ये लिहिताना असे म्हटले आहे की, “आज वांद्रे येथील शासकीय वसाहतीतील रहिवाशांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात शासकीय वसाहतीच्या पुनर्विकासाच्या प्रस्तावाला तत्त्वतः मंजूरी दिल्याबद्दल, येथील रहिवाशांनी उद्धवसाहेब ठाकरे यांचे आभार मानले.”

मुख्यमंत्री पदावरून पाय उतार झाल्यानंतर सुद्धा अनेक लोक अजूनही उद्धव ठाकरे यांच्या भेटीस येतात, आपुकीने चौकशी करतात आणि झालेल्या कामांचे आभार मानून समाधानाने पुन्हा घरी परतत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

हे सुद्धा वाचा…

लब्यू उद्धवजी, मराठी अभिनेत्याचे उद्धव ठाकरे यांना पत्र

आदित्य ठाकरे यांनी सभागृहात राहूल नार्वेकरांचे सांगितले नाते

शिवाजीराव आढळराव – पाटील हे शिवसेनेतच, त्यांची हकालपट्टी नाही!

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी