29 C
Mumbai
Saturday, September 3, 2022
घरमुंबईBDD Chawl Redevelopment : पोलिसांना मिळणाऱ्या घरांच्या किंमतीची मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

BDD Chawl Redevelopment : पोलिसांना मिळणाऱ्या घरांच्या किंमतीची मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

मुंबईत असलेल्या बीडीडी चाळीमध्ये पोलिसांना कमी किंमतीत घरे देण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (ता. २४ आगस्ट) पावसाळी अधिवेशनात केली. पण आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीडीडी चाळीमध्ये पोलिसांना देण्यात येणाऱ्या घरांच्या किंमतीची माहिती दिली आहे.

मुंबईत असलेल्या बीडीडी चाळीमध्ये (BDD Chawl Redevelopment) पोलिसांना कमी किंमतीत घरे देण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (ता. २४ आगस्ट) पावसाळी अधिवेशनात केली. पण आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीडीडी चाळीमध्ये पोलिसांना देण्यात येणाऱ्या घरांच्या किंमतीची माहिती दिली आहे. बीडीडी चाळीचा पुनर्विकास झाल्यानंतर त्याठिकाणी पोलिसांना १५ लाख रुपयांत घरे देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात बीडीडी चाळीचा पुनर्विकास करण्यासंबंधीचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला होता. महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री असलेले जितेंद्र आव्हाड यांनी या चाळीच्या पुनर्विकासाचा सतत पाठपुरावा करून हा महत्वपूर्ण निर्णय घेतला होता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून बीडीडी चाळीत पोलिसांना १५ लाखात घरे देण्यात येणार असल्याची घोषणा केली. तसेच याबाबत आणखी काही चांगले निर्णय घेता येतील का ? हे देखील पाहणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. पावसाळी अधिवेशनातील अंतिम आठवडा प्रस्तावात उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ही महत्वाची घोषणा करण्यात आली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल बीडीडी चाळीच्या पुनर्वसनात पोलिसांना कमी किंमतीत देण्याची माहिती दिली होती. पण पोलिसांना या चाळीच्या पुनर्विकासाच्या अंतर्गत कमी किंमतीत घरे देण्यात यावी, अशी मागणी आमदार कालिदास कोळंबकर यांच्याकडून करण्यात आली होती आणि तेच माझे देखील मत होते, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सांगण्यात आले. पण असे केल्यास शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये भेदभाव होईल, जो करता येणार नाही, असे देखील फडणवीस म्हणाले होते.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात बीडीडी चाळीच्या पुनर्वसनाचा निर्णय घेऊन काम सुरु करण्यात आले. त्यावेळी महाविकास आघाडी सरकारकडून बीडीडी चाळीतील राहवाशांना ५०० चौरस फुटाची घरे मोफत घरे देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला पण यामुळे मात्र पोलिसांच्या घरांचा प्रश्न ऐरणीवर आला होता.

हे सुद्धा वाचा

Ajit Pawar : अजित पवारांवर टीका करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना ‘कॅग’ची चपराक

Raju Srivastav : 15 दिवसानंतर कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीत झाली सुधारणा

Maharashtra Assembly Session : गद्दारी केलेल्यांनी राजीनामा द्यावा : आदित्य ठाकरे

दरम्यान, तेव्हा महाविकास आघाडी सरकारने पोलिसांना ५० लाख रुपयांत घरे देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला अनेक विरोध झाले होते, त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने पोलिसांना २५ लाखात घरे देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आता तर शिंदे-भाजप सरकारने २५ लाखांपेक्षा कमी म्हणजेच अवघ्या १५ लाखात पोलिसांना बीडीडी चाळीच्या पुनर्विकासात घरे देण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी