33 C
Mumbai
Wednesday, April 17, 2024
Homeमुंबईहोऊ द्या चर्चा...! पुन्हा मुख्यमंत्री शिंदे चर्चेत

होऊ द्या चर्चा…! पुन्हा मुख्यमंत्री शिंदे चर्चेत

टीम लय भारी

मुंबई : आज राज्यभर गुरूपोर्णिमेचा दिवस उत्साहात साजरा करण्यात येत आहे. लहानांपासून – मोठ्यांपर्यंत सगळेच आपल्या आदर्शाला हा दिवस समर्पित करून कोणी पोस्ट करून तर कोणी प्रत्यक्ष भेटून कृतज्ञता व्यक्त करीत आहेत. बहुचर्चित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा सोशल मिडीयावर पोस्ट करून बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांना गुरूपोर्णिमेनिमित्त अभिवादन केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आनंद दिघे यांच्यातील गुरू – शिष्याचे नाते ठाणेकरांना चांगलेच ठाऊक आहे, त्यावर धर्मवीर सिनेमाने शिक्कामोर्तब करत हे नाते अगदी घराघरापर्यंत पोहोचवले आहे. अनेक वर्षे बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांनी दाखवलेल्या मार्गावर शिंदे कायम चालत राहिले. दोघांना सुद्धा ह्रदयात गुरूचे स्थान देत त्यांनी आजचा गुरूपोर्णिमेचा दिवस दोघांना समर्पित केला आहे.

याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी सोशल मिडीयावर ट्विट केले आहे. ट्विटमध्ये शिंदे लिहितात, “बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच. विझणार कधीच अंगार नाही, हिंदुत्वाशिवाय विचार नाही…. गुरुपौर्णिमेनिमित्त विनम्र अभिवादन…” असे म्हणून त्यांनी शुभेच्छांचे पोस्टर सुद्धा पोस्ट केले आहेत.

दरम्यान, उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि शिवसेनेतील अनेक वरिष्ठ यांच्याकडून गुरूपोर्णिमेनिमित्त कोणतीच पोस्ट आलेली नाही, त्याआधीच आनंद दिघे यांच्यासोबतच बाळासाहेबांना सुद्धा गुरूपोर्णिमेनिमित्त एकनाथ शिंदे यांनी अभिवादन केले आहे, त्यामुळे शिवसेनेतील पक्षप्रमुखांसह इतर उरल्या – सुरल्या लोकांना हा डिवचण्यात तर प्रकार नाही ना अशी उलट सुलट चर्चा ऐकायला मिळत आहे. या पोस्टनंतर एकनाथ शिंदे पुन्हा चर्चेत आले असून त्यावर हजारो लोकांनी लाईक्सचा पाऊस पाडत प्रतिसाद दिला आहे.

हे सुद्धा वाचा…

VIDEO : शासन-प्रशासनामुळेच ओबीसींच्या नशिबी आली उपेक्षा

देवेंद्र फडणवीस यांच्या सचिव पदी डाॅ. श्रीकर परदेशी यांची नियुक्ती

स्त्री लंपट भाजप नेत्याची अखेर हकालपट्टी !

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी