29.5 C
Mumbai
Saturday, May 13, 2023
घरमुंबईस्वयंपाकाचा गॅस 50 रुपयांनी वाढला, महागाईचा भडका

स्वयंपाकाचा गॅस 50 रुपयांनी वाढला, महागाईचा भडका

घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात मोठी दरवाढ केल्यामुळे महागाईच्या भडक्यात आधीच होरपळून निघालेल्या सर्वसामान्यांसाठी हा मोठा धक्काचं आहे.

आधीच महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या सर्वसामान्य नागरिकांची चिंता वाढवणारी बातमी आहे. मार्च महिना सुरू होताच पुन्हा एकदा महागाईचा भडका उडाला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी मार्च महिन्याच्या पहिल्याच तारखेला गॅस सिलिंडरच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत. घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा धक्का बसला आहे. (Cooking gas hike)

धन कंपन्यांनी जारी केलेल्या नव्या दरानुसार, 1 मार्चपासून घरगुती गॅस सिलिंडरचे दर 50 रुपयांनी वाढवण्यात आले आहे. 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरातही तब्बल 350 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आधीच महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या सर्वसामान्यांना बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे.

घरगुती गॅस (LPG Gas) सिलिंडरचे दर ५० रुपयांनी वाढवण्यात आल्याने मुंबईत 14.2 किलोच्या घरगुती सिलिंडरची किंमत आता 1 हजार 102 इतकी झाली आहे. बुधवारी सकाळपासून घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ झाल्याने शहरातील लाखो ग्राहकांवर खर्चाचा बोजा वाढला आहे. दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडर पाठोपाठ व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरातही तब्बल 350 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

असे असतील घरगुती सिलिंडरचे नवे दर :
मुख्यत्वे आजपासून दिल्लीत 14.2 किलोचा घरगुती एलपीजी सिलिंडर 1053 रुपयांऐवजी 1103 रुपयांना मिळणार आहे. मुंबईत हा सिलेंडर 1052.50 रुपयांऐवजी 1102.5 रुपयांना विकला जाईल. कोलकात्यात त्याची किंमत 1079 रुपयांऐवजी 1129 रुपये आणि चेन्नईमध्ये 1068.50 रुपयांऐवजी 1118.5 रुपये असेल.

हे सुद्धा वाचा :

जिऱ्याच्या फोडणीला बसतोय महागाईचा तडका; हे आहे कारण

MSEDCL : मुंबईकरांना होणार 15% वीज दरवाढीची डोकेदुखी

RBI Repo Rate Hike : नव्या वर्षात आरबीआयचा दणका; पुन्हा वाढवले व्याजदर

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी