टिम लय भारी
मुंबई : कोरोनास प्रतिबंध करण्यासाठी जगात प्रथम लसीकरणास (Corona vaccine) सुरुवात करणा-या रशियाने भारतात २०२१ पर्यंत ३० कोटी स्पुटनिक ५ लशींचे उत्पादन करणार असल्याची माहिती दिली. त्यासाठी रशिया भारतातील ४ प्रमुख लस निर्मिती कंपन्यांशी चर्चा करणार आहे.
“भारत २०२१ मध्ये स्पुटनिक लशीचे ३० कोटी डोस तयार करेल. यासाठी भारतातील चार कंपन्यांशी बोलणी सुरु केली. भारत पुढील वर्षी ३० कोटी डोस तयार करु शकतो,” अशी माहिती रशियन डायरेक्ट इन्वेस्टमेंट फंडचे प्रमुख किरील दिमित्रेव यांनी सांगितलं आहे.
लसीची निर्मिती करणारी कंपनी गमालिया रिसर्च सेंटर फॉर एपिडेमियोलॉजी अँड माइक्रोबायोलॉजीने स्पुटनिक ५ ही लस ९१.५ टक्के प्रभावी असल्याचा दावा केला आहे. जवळपास २३ हजार जणांवर याची चाचणी घेण्यात आली आणि त्यानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. लसीच्या ट्रायलचा डाटा लवकरच सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित केला जाणार आहे. दरम्यान, रशियाच्या या लसीवर अनेक देशांनी शंका घेतली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…
3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…
लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…
बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…
लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…
मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…