मुंबई

Dasara Melava 2022 : दसरा मेळाव्यात कोणाची गर्जना होणार, न्यायालयाचा उद्या निकाल

यंदा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा (Dasara Melava 2022) घेण्याचा नेमका मान कोणाचा यावर गेल्या अनेक दिवसांपासून वादावादी सुरू आहे. शिवसेनेविरोधात बंड पुकारत एकनाथ शिंदे यांनी आपला स्वतंत्र गट स्थापन करीत त्याला ‘शिवसेना’ संबोधणे सुरू केले आहे. या आवाजाला साथ देण्यासाठी अनेक आमदार, खासदार, नगरसेवकांपासून सामान्य शिवसैनिक सुद्धा पुढे सरसावले आहेत, त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा शिंदे गट गाजवणार की ठाकरे गट याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान मुंबई महानगरपालिकेकडून सदर मेळावा घेण्याबाबत परवानगी न मिळाल्याने शिवसेनेने थेट न्यायालय गाठले आहे. या याचिकेवर तातडीने न्यायमूर्ती रमेश धनुका व न्यायमूर्ती कमल खाटा यांच्याकडून उद्या सुनावणी ठेवली असून याबाबत उद्याच फैसला करण्यात येणार आहे.

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याबाबत शिवसेनेने महापालिकेकडून परवानगी मागितली असता अद्याप महापालिकेकडून कोणतेच उत्तर देण्यात आलेले नाही. त्यामुळे यावर शेवटचा पर्याय म्हणून शिवसेनेचे सचिव अनिल देसाई यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. देसाई यांनी मुंबई महापालिका, मुंबई महापालिका आयुक्त आणि जी-उत्तर वॉर्डचे सहायक आयुक्त यांच्या विरोधात रीट याचिका दाखल करीत या प्रकरणी तातडीने सुनावणी करण्याबाबत विनंती केली आहे. दरम्यान न्यायमूर्ती रमेश धनुका यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ किंवा न्यायमूर्ती संजय गंगापुरवाला यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ यांच्यासमोर ही तातडीची सुनावणी पार पडणार आहे.

हे सुद्धा वाचा…

Raju Srivastav Passed Away : हास्यवीर राजू श्रीवास्तव यांनी घेतला अखेरचा श्वास

Prakash Ambedkar : ‘आम्ही काँग्रेस आणि शिवसेनेवर आघाडी करायला तयार आहोत’

Mother Kills Daughter: पालघरमध्ये आईने स्वत:च्या मुलीला मारून कचरापेटीत पुरले

दसरा मेळाव्याची तारीख जवळ आली तरीही शिंदे आणि ठाकरे गटातील वाद शमण्याची चिन्हे दिसत नाहीत. या वादात आता शिवसेनेच्या बाजूने राष्ट्रवादीसुद्धा उभी राहिली असून राष्ट्रवादीकडून अजित पवार यांनी सुद्धा शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची परवानगी मिळावी म्हणून मागणी केली. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले होते की, उद्धव साहेबांनी आणखी काही दिवस परवानगी मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत. दसरा मेळाव्याची वेळ जवळ आली आहे, ५ ऑक्टोबरला हा मेळावा होणार आहे. त्यामुळे आता उच्च न्यायालयात जाऊन परवानगी घेण्यात यावी. यापूर्वीही अशाप्रकारे परवानग्या घेण्यात आल्या आहेत. शिंदे गटाला बीकेसी येथे मेळावा घेण्याची परवानगी मिळाली आहे. मग शिवाजी पार्कची जागा उद्धव ठाकरे यांना मिळावी. राज्यातील जनतेला दोघांचेही विचार ऐकायला मिळावेत असे शिवसेनेची पाठराखण केली होती.

या संपुर्ण पार्श्वभूमीवर न्यायालय काय निर्णय देणार आणि यंदाच्या दसरा मेळाव्यात कोणाचा आवाज घुमणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

सुचित्रा पेडणेकर

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

1 day ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

1 day ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

1 day ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

1 day ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

1 day ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

1 day ago