31 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeमुंबईदाऊद इब्राहिम सापडला...

दाऊद इब्राहिम सापडला…

मुंबईत १९९३ साली बॉम्बस्फोटांची मालिका घडवून कित्येक निष्पाप लोकांचे बळी घेणारा नराधम कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कासकर याला अमेरिकेने २००३ साली आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. त्याच्यावर अमेरिकेने तब्बल २५ दशलक्ष डॉलरचे (सुमारे २०४ कोटी रुपये) इनाम घोषित केले आहे. त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी भारतीय गुप्तचर यंत्रणा मागील कित्येक वर्षे त्याच्या मागावर आहेत. तो शेजारच्या पाकिस्तानमध्ये असल्याचे उघड गुपित आहे परंतु त्याच्या नेमक्या ठावठिकाण्याबाबत तर्कवितर्क लढविण्यात येत होते. आता त्याचा भाचा दाऊदची बहीण हसीना पारकर हिचा मुलगा अलीशाह पारकर याने आपला मामाजान दाऊद इब्राहिम नेमका कुठे राहतो याबाबत तपास यंत्रणांना माहिती दिली आहे.

दाऊद इब्राहिम कासकर (Dawood Ibrahim) याचा भाचा अलिशाहा कासकर सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) ताब्यात आहे. त्याच्या चौकशीत त्याने अनेक स्फोटक माहिती समोर आली आहे. दाऊद हा काराचीमधील डिफेन्स परिसरातील अब्दुल्ला गाझी बाबा दर्गाहनजीक राहत असल्याचे त्याने सांगितले. त्याचा मामाजान दुसऱ्यांदा बोहल्यावर चढल्याचे या चौकशीत समोर आले आहे. त्याची नवीनवेली बेगम पाकिस्तानातील (Pakistan) पठाण कुटुंबातील असल्याचे अलीशाह याने सांगितले. या माहितीच्या आधारे आता दाऊदला भारतात आणण्यात सरकारला यश येईल का हे पाहणे उद्बोधक ठरणार आहे. (Dawood’s found…Alishaha’s investigation has revealed)

हे सुद्धा वाचा

शिंदे सरकारने महाराष्ट्रासाठी आणली ४५ हजार कोटींची गुंतवणूक

बालाजी ऑईल मिलच्या मालकाकडून 8 लाखांची खंडणी उकळणाऱ्या न्यूज 24च्या पत्रकारासह 8 जण पोलिसांच्या ताब्यात

शिक्षण मंत्री दीपक केसरकरांच्या कार्यालयात सामान्य जनतेला मिळते अपमानास्पद वागणूक

दाऊदचा भाचा अलीशाह याने ‘एनआयए’ ला दिलेल्या माहितीत अनेक गोष्टींचा उलगडा झाला आहे. अलीशाहला दाऊदच्या सतत संपर्कात होता. दाऊद हवालाच्या माध्यमातून त्याला पैसे पाठवीत होता. याच पैशांतून अलीशाह दाऊदचे सर्व बेकायदेशीर धंदे चालवत होता. धक्कादायक बाब म्हणजे मुंबईत आणि भारतात इतर ठिकाणी दहशतवादी कारवाया करण्यासाठी याच पैशांचा वापर करण्यात येणार होता.

अलीशाहची महजबीनशी दुबईत भेट
दाऊदने दुसऱ्यांदा निकाह केल्याचे त्याची पहिली पत्नी मेहजबीनने अलीशाह याला सांगितले. २०२२ मध्ये तो दुबईत महजबीनला भेटला होता. या भेटीत दाऊदने दुसरे लग्न केल्याचे तिने अलीशाह हिला सांगितले. मेहजबीन तिच्या मुंबईतील नातेवाईकांसोबत व्हॉट्सअप कॉलद्वारे संवाद साधत असते, अशी माहिती अलीशाहने राष्ट्रीय तपस यंत्रणेला दिली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी