24 C
Mumbai
Thursday, November 30, 2023
घरमुंबईडेक्कन ओडिसी ट्रेन २.० पुन्हा नव्या रूपात रूळावर

डेक्कन ओडिसी ट्रेन २.० पुन्हा नव्या रूपात रूळावर

आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिलेली परंतू कोविड महामारीमुळे बंद करण्यात आलेली डेक्कन ओडिसी ट्रेन २.० नव्या रूपात धावण्यास सज्ज झाली आहे. डेक्कन ओडिसी ट्रेन २.० या ट्रेनचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस,फलाट क्रमांक १८ येथे गुरूवार दिनांक २१ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी २ वाजता विधानसभेचे अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रध्दा जोशी-शर्मा, भारतीय रेल्वेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत होणार आहे. मान्यवरांना घेवून ही ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे असा प्रवास करणार आहे.

देशातील प्रसिध्द ४ शाही रेल्वेपैकी एक असणारी आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिलेली डेक्कन ओडिसी ट्रेन २.० ही नव्या रूपात पुन्हा पर्यटकांसाठी खुली होणार आहे. या ट्रेनमध्ये अत्यंत उच्च दर्जाच्या सोयी सुविधा देण्यात येतात. २००४ ते २०२० पर्यंत या अलिशान व आरामदायी ट्रेनला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.

मात्र कोरोना महामारीमुळे अख्खे जग थांबले अर्थात पर्यटनही थांबले. मात्र सध्या डेक्क्न ओडिसी ट्रेन अत्याधुनिक सोयी सुविधेने पुन्हा पर्यटकांच्या सेवेकरिता सुरू होत आहे. या नुतनीकरण करण्यात आलेल्या डेक्कन ओडिसी सहलींमध्ये महाराष्ट्र व्यतिरिक्त देशातल्या अन्य राज्यामधील पर्यटन स्थळांचाही समावेश करण्यात आला आहे.

भारतीय रेल्वेची पॅलेस ऑन व्हील्स (Palace on Wheels) या योजनेनुसार सुरू करण्यात आलेली डेक्कन ओडिसी ट्रेन शाही पाहुणचारसाठी ओळखली जातात. शान-ओ-शौकतचे उदाहरण असलेला ही ट्रेन व्हीलवरचा चालता-फिरता राजमहल आहे. ही डेक्कन ओडिसी ट्रेन १६ जानेवारी २००४ मध्ये सुरू झाली होती.

हे सुद्धा वाचा
मंत्र्यांना प्यारा झाला व्हॉट्सअप, नव्या माध्यमातून जनतेशी संवाद
टोमॅटोच्या दरात मोठी घसरण; तीन ते पाच रुपये किलोपर्यंत खाली
चांद्रयान मोहिमेची आरास ठरतेय गणेश भक्तांचं आकर्षण

शाही वागणूक मिळणाऱ्या या ट्रेनमध्ये दोन मल्टी-कुजीन रेस्तरां पेशवा-१ आणि पेशवा -२ असे हॉटेल्स आहेत. डेक्कन ओडिसी ट्रेनच्या कोचमध्ये पर्सनल सेफ, टेलीफोन आणि अटैच्ड बाथरूम, जिम उपलब्ध आहेत. ही ट्रेन पूर्णतः एयर कंडीशनर आणि इंटरनेट कनेक्टिविटीने युक्त आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी