28 C
Mumbai
Tuesday, September 6, 2022
घरमुंबईEknath Shinde Cabinet Expansion : दीपक केसरकरांना मंत्रीपद, निलेश राणेंची मात्र फजिती...

Eknath Shinde Cabinet Expansion : दीपक केसरकरांना मंत्रीपद, निलेश राणेंची मात्र फजिती !

दीपक केसरकर यांनी निलेश राणे यांची लायकी काढली होती. एवढेच नव्हे तर, आपल्याकडे वाहन चालकाची एक जागा शिल्लक आहे. त्या ठिकाणी तुम्हाला नोकरी देतो, असे कुत्सित ट्विट सुद्धा निलेश राणे यांनी केले होते.

माजी खासदार निलेश राणे यांचा आज चांगलाच पोपट झाला. कारण चार – पाच दिवसांपूर्वी त्यांनी एक विधान केले होते. या विधानामुळे निलेश राणे अक्षरशः तोंडावर आपटले आहेत. ही वेळी आणली आहे, त्यांचे कट्ट्र प्रतिस्पर्धी दीपक केसरकर यांनी. दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी आज मंत्रीपदाची शपथ घेतली. दीपक केसरकर यांची निलेश राणे यांनी लायकी काढली होती. एवढेच नव्हे तर, आपल्याकडे वाहन चालकाची एक जागा शिल्लक आहे. त्या ठिकाणी तुम्हाला नोकरी देतो, असे कुत्सित ट्विट सुद्धा निलेश राणे यांनी केले होते.निलेश राणे यांनी ट्विट करून जेमतेम चार – पाच दिवस उलटत नाहीत, तोच केसरकर मंत्रीपदावर आरूढ झाले आहेत.

त्यामुळे निलेश राणे यांची चांगलीच फजिती झाली आहे. केसरकर यांनी तीन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेवून राणे कुटुंबियांवर तोफ डागली होती. राणे कुटुंबियांनी आदित्य ठाकरे यांची खोटी बदनामी केल्याचा आरोप केसरकर यांनी केला होता. त्यानंतर निलेश राणे यांनी केसरकर यांना वाहन चालकांची नोकरी देवू केली होती. तसे कुत्सित ट्विट निलेश राणे यांनी केले होते. पण प्रत्यक्षात मात्र केसरकर यांना मंत्रीपद मिळाले आहे.

हे सुद्धा वाचा

Eknath Shinde Cabinet Expansion : एकनाथ शिंदे म्हणाले, मोदी – शाह यांनी महाराष्ट्राच्या विकासाबाबत नवीन निर्णय घेतले आहेत

Eknath Shinde cabinet expansion : चित्रा वाघ एकाकी; शिंदे गट संजय राठोडांच्या पाठीशी, भाजपने हात वर केले, विरोधकांनीही राठोड निर्दोष असल्याचे सांगितले

Eknath Shinde Cabinet Expansion : सुप्रिया सुळे म्हणाल्या, संजय राठोडांना मंत्रीपद मिळाल्याचा मनापासून आनंद

सिंधुदुर्गच्या राजकारणात नारायण राणे कुटुंबिय व दीपक केसरकर यांच्यात विळ्या भोपळ्याचे नाते आहे. दोन्हीही गटातून एकमेकांवर सतत वार केले जातात. आतापर्यंत दोघेही परस्पर विरोधी भूमिका असलेल्या राजकीय पक्षांमध्ये कार्यरत होते. पण आता दोघेही सत्ताधारी पक्षांमध्ये आहेत. तरीही या दोन्ही गटांतून एकमेकांवर आरोप केले जात असतात. नितेश राणे यांना मंत्रीपद मिळेल अशी जोरदार चर्चा होती. याउलट दीपक केसरकर यांच्या मंत्रीपदाबद्दल काहीच चर्चा नव्हती. प्रत्यक्षात मात्र नेमके उलटेच झाल्याचे दिसून आले आहे.

दीपक केसरकर यांना मंत्रीपद मिळाल्याने विद्यमान सरकारमध्ये केसरकर यांचे वजन वाढले आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्रीपद सुद्धा आता केसरकर यांनाच मिळण्याची चिन्हे आहेत. केसरकर यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आहे.देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना शिवसेनेच्या कोट्यातून दीपक केसरकर राज्यमंत्री होते. परंतु उद्धव ठाकरे सरकारमध्ये केसरकर यांना मंत्रीपदाची संधी मिळाली नव्हती. त्यामुळे ते नाराज होते. अशातच शिंदे यांनी बंडखोरी केली. थेट गुवाहाटीत दाखल होवून केसरकर यांनी शिंदे गटाची बाजू जोरदारपणे लावून धरली होती. त्यामुळे त्यांना शिंदे गटाचे प्रवक्तेपद सुद्धा त्यांना मिळाले. शिंदे गटाची बाजू सांभाळताना केसरकर उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्याविषयी अनेकदा सहानुभूती सुद्धा व्यक्त केली होती. मात्र राणे कुटुंबांसोबत असलेले पारंपरिक वैर सुद्धा केसरकर यांनी जपण्याची भूमिका अद्याप ठेवलेली आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी