28 C
Mumbai
Tuesday, August 2, 2022
घरमुंबईउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप

टीम लय भारी

मुंबई : औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजी नगर करण्यावरून भाजप-शिंदे सरकारकडून शुक्रवारी या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. परंतु याबाबतचा निर्णय पुन्हा एकदा घेण्यात आला आहे. औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजी नगर तर उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याच्या निर्णयाला अखेर भाजप-शिंदे सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे. त्याचबरोबर नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला सुद्धा दि. बा. पाटील यांचे आंव देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची माहिती पत्रकार परिषद घेऊन दिली.

या पत्रकार परिषदेच्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेतून सरपंच आणि नगराध्यक्ष थेट निवड करण्यात येणार असल्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आरोप केला आहे. सरपंच आणि नगराध्यक्ष यांची निवड जनतेने केल्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पैशांची खेळी करता येणार नसल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

सरपंच आणि नगराध्यक्ष यांची निवड थेट जनतेने करावी असा निर्णय भाजाप-सेनेचे सरकार असताना घेण्यात आला होता. पण हा निर्णय महाविकास आघडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर काढून टाकण्यात आला. परंतु आता भाजपने शिंदे गटासोबत सरकार स्थापन केल्यानंतर हा निर्णय पुन्हा एकदा घेण्यात आला आहे. या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने विरोध केला आहे.

सदर निर्णय हा गुरुवारी झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीनंतर घेण्यात आला. म्हणून या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि काँग्रेस पक्षाला पैशांची खेळी करता येणार नसल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सांगण्यात आले. दरम्यान, या निर्णयामुळे पात्र तसेच जनतेचा आवडता व्यक्ती या पदावर बसेल म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

या निर्णयामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पैशांची खेळी करता येणार नाही. जवळपास सर्वच राज्यात सरपंच आणि नगराध्यक्ष यांची जनतेकडून निवड करण्यात येते. फक्त अजूनही महाराष्ट्र्रात असे होत नाही. इतकेच नव्हे तर महापौर सुद्धा जनतेतूनच निवडण्यात येतो. पण आपल्याकडे तसे होणार नाही, असेही यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा :

पालघरमध्ये शिवसेनेला बसला मोठा धक्का

भाजप नेत्यानेच ‘मोदीभक्तां’ची केली चंपी

विरोधक मुद्यावरुन थेट गुद्यावर

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!