25 C
Mumbai
Thursday, November 30, 2023
घरमुंबईमुंबई पोलीस दलात 'विशेष पोलीस आयुक्त' पदाची निर्मिती, पहिला मान देवेन भारती...

मुंबई पोलीस दलात ‘विशेष पोलीस आयुक्त’ पदाची निर्मिती, पहिला मान देवेन भारती यांना!

शिंदे-फडणवीस सरकारने मु्ंबई पोलीस दलात एका नव्या पदाची निर्मिती केली आहे. विशेष पोलीस आयुक्त  (Special Commissioner of Police, Mumbai) असे हे पद असून या पदावर आयपीएस अधिकारी देवेन भारती (Deven Bharti) यांची नियुक्ती सरकारने केली आहे. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे जवळचे अधिकारी म्हणून देवेन भारती यांना ओळखले जाते. देवेन भारती हे १९९४ सालच्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. (Deven Bharti First Special Commissioner of Police, Mumbai)

महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांची महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पक्षकाच्या प्रमुखपदावरुन बदली करण्यात आली होती. त्यानंतर काही काळाने त्यांना महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाच्या अपर पोलीस महासंचालक पदावर नियुक्ती देण्यात आली होती. त्यानंतर आता मुंबई पोलीस दलात विशेष पोलीस आयुक्तपदाची निर्मिती करुन देवेन भारती यांची त्या पदावर नियुक्ती केली आहे.

हे सुद्धा वाचा

अदानीविरोधातील उद्रेकापुढे अखेर सरकार नमले; वीज कर्मचाऱ्यांचा संप मागे

अजित पवार भूमिकेवर ठामच; स्वराज्यरक्षक ही उपाधी व्यापक आणि सर्वसमावेशक

आंबेडकरवादी नेते जोगेंद्र कवाडे एकनाथ शिंदे यांच्या कळपात; आता महाराष्ट्रभर घेणार सभा

याआधी सेना-भाजप सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री अशी दोन्ही पदे होती. त्यावेळी गृहखात्यावर फडणवीस यांनी आपली पकड मजबूत केली होती. महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर फडणवीस पुन्हा गृहमंत्री झाले. सरकारबदलताच राज्यातील आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा सुरू झाला. फडणवीस यांच्या जवळचे मानले जाणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. आता मुंबई पोलीस दलात नव्या पदाची निर्मिती करुन फडणवीस यांनी देवेन भारती यांना त्या पदावर नियुक्ती दिली आहे. त्यामुळे देवेन भारती हे मुंबई पोलीस दलातील पहिले विशेष पोलीस आयुक्त ठरले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी